Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित साकारणार राजमाता जिजाऊंची भूमिका

Tejaswini Pandit : जिजाऊंच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा सिनेमा आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून या सिनेमात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे.

0
Tejaswini Pandit
Tejaswini Pandit

नगर : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.आपल्या प्रत्येक भूमिकेनं तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता तेजस्विनीचा ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ (Swarajya Kanika Jijau) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तेजस्विनीचा या सिनेमातील लूक आऊट करण्यात आला आहे.

नक्की वाचा : शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीज ;एकदा पहाच!

तेजस्विनी पंडित साकारणार जिजाऊंची भूमिका (Tejaswini Pandit )

जगाला दिशा देणाऱ्या या जिजाऊंच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा सिनेमा आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून या सिनेमात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे.आता या सिनेमाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. या सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे यांनी केले आहे. राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम असे अनेक गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली मात्र या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखीच प्रखर झाली.

अवश्य वाचा : अतिवृष्टीचे अनुदान वाटप भोवले; ‘या’ तालुक्यातील तहसीलदार झाले निलंबित  

जिजाऊंच्या भूमिकेसाठी तेजस्विनीची निवड (Tejaswini Pandit )

‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणाले,”राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता”. वीरमातेच्या जीवनकाळाचे कथानक दोन-अडीच तासात मांडणे एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होते जिजाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व,त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग-घटना आम्ही प्रेक्षकांना दाखवणार आहोत”.ही असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती. तेजस्वीनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच शिवाय एक व्यक्ति म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक व सहाय्यक आहे. तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित व प्रामाणिक आहे.

तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाली, राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here