Balasaheb Thorat : जावेद अलीच्या विविध गाण्यांवर थिरकली तरुणाई

Javed Ali : जयंती महोत्सवात बॉलीवूड मधील आघाडीचा गायक जावेद आली यांनी गायलेल्या गीतांवर संगमनेरमधील तरुणाईने प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

0
Javed Ali
Javed Ali

Balasaheb Thorat : संगमनेर : विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जयंती महोत्सवात (Festival) बॉलीवूड मधील आघाडीचा गायक जावेद आली (Javed Ali) यांनी गायलेल्या कजरारे, वंदे मातरम, पुष्पा मधील श्रीवल्ली गाण्यासह विविध गीतांवर संगमनेरमधील तरुणाईने प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणावर अजय महाराज बारस्करांनी सांगितला तोडगा

लाईव्ह कॉन्सर्ट (Balasaheb Thorat)

Javed Ali
Javed Ali


जाणता राजा मैदानावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात जावेद आली लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, शरयूताई देशमुख, डॉ.हर्षल तांबे आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवलेल्या गोष्टी, राहुल नार्वेकरांनी ठरवल्या वैध

तरुणाईचा जल्लोष (Balasaheb Thorat)

Javed Ali
Javed Ali


जावेद अली लाईव्ह कॉन्सर्टसाठी जाणता राजा मैदानावर तरुणांची अलोट गर्दी होती. जर्मन हँगर मंडपाच्या बाहेरही दोन्ही बाजूला एलडी स्क्रीनची व्यवस्था केली होती संपूर्ण मैदानावर तरुणाईचा एकच जल्लोष होता.अत्यंत झगमगटात पुष्पा फेम जावेद अलीचे व्यासपीठावर आगमन होताच तरुणाईचा एकच जल्लोष झाला. जावेद अलीने हिंदी चित्रपट सृष्टीतील तरुणाईच्या ओठावर असलेली एकापेक्षा एक सरस गाणी गायली. यामध्ये कजरारे कजरारे तेरे काले काले नैना गाण्याला सर्वांनी ठेका धरत साथ दिली. तर पुष्पा मधील श्री वल्ली हे गाणे लागतात सर्वांनी मोठ्या उत्साहाने एकत्रित गाणे गात या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरला. याचबरोबर सुफी गीतांची मैफिल सादर झाल्यानंतर गायलेले वंदे मातरमने सर्वांच्या अंगावर शहारे उभे केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here