Theft of Gold Jewelry : तुळजवाडीत अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; सुमारे ३ तोळे सोने लंपास

घराच्या मागील बाजूच्या भिंतीतील विटा काढून चोरट्यांचा घरात प्रवेश

0
Theft of Gold Jewelry : तुळजवाडीत अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; सुमारे ३ तोळे सोने लंपास
Theft of Gold Jewelry : तुळजवाडीत अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; सुमारे ३ तोळे सोने लंपास

Theft of Gold Jewelry : पाथर्डी : तालुक्यातील तुळजवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील भिंतीच्या विटा काढून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने (Theft of Gold Jewelry), चांदीचे चाळ व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात (Pathardi Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. याबाबत संदीप भिमराव कराड (वय ४०, रा. तुळजवाडी, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

नक्की वाचा : भोंदू राजेंद्र गडगेची न्यायालयीन कोठडी कायम; गडगेची मुलगी व इतर दोघांचे अटकपूर्व जामिन फेटाळले

घराच्या विटा काढून चोरट्यांचा घरात प्रवेश

कराड कुटुंब शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असून त्यांचा मुलगा शुभम कराड हा जम्मू-काश्मीर येथे सैन्यात कार्यरत आहे. फिर्यादीनुसार, २० मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कुटुंबीयांनी जेवण करून घराच्या दोन्ही खोल्यांना कुलूप लावले व घरासमोर झोप घेतली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यानंतर घराच्या मागील बाजूच्या भिंतीतील विटा काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पत्र्याच्या पेटीत ठेवलेला दागिन्यांचा डबा गायब (Theft of Gold Jewelry)

घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेला दागिन्यांचा डबा गायब झाल्याने शोध घेतला असता घराच्या पाठीमागील शेतात डबा, सुटकेस, बॅग व कपडे पडलेले आढळले. मात्र, त्यामधील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी सुमारे ३ तोळे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १० भार वजनाचे चांदीचे चाळ तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद दाखल केली गेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत