Three-year-old boy injured in leopard attack : कुंभेफळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी

Three-year-old boy injured in leopard attack : कुंभेफळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी

0
Three-year-old boy injured in leopard attack : कुंभेफळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी
Three-year-old boy injured in leopard attack : कुंभेफळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी

Three-year-old boy injured in leopard attack : अकोले : अकोले तालुक्यातील कुंभेफळ (Kumbhephal) येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या तीनवर्षीय अंकुर प्रशांत कोटकर याच्यावर बिबट्याने हल्ला (Three-year-old boy injured in leopard attack) केल्याची घटना शुक्रवारी (ता.२१) दुपारी ३ वाजता घडली आहे. आई, आजी, आजोबा आणि शेतातील कामगारांनी प्रसंगावधान राखत बालकाची बिबट्याच्या (Leopard) तावडीतून सुटका केली.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जखमी अंकुरला प्रथम सुगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पोपट कोटकर, बबन झोळेकर घटनास्थळी पोहचले. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत बालकाची विचारपूस केली. या घटनेने कुंभेफळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने परिसराची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण (Three-year-old boy injured in leopard attack)

कुंभेफळ परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा धोक्याची घंटा ठरला आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात याच परिसरात तीनवर्षीय श्रीशा वैभव शिंदे या बालिकेवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळीही नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला आणि मोठा अनर्थ टळला होता. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी दिलीप कोटकर, सुनील कोटकर, संजय कोटकर, नामदेव कोटकर, यशवंत पांडे, शंकर पांडे, संपत कोटकर आदी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान शनिवारी घटनास्थळी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांनी सांगितले.