Top in the state : अहिल्यानगर जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी

0
Top in the state : अहिल्यानगर जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी
Top in the state : अहिल्यानगर जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी

Top in the state : नगर : राज्य सेवा आयुक्त (नाशिक विभाग) श्रीमती चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या दोन दिवसीय दौऱ्यात जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत आणि जनसेवेच्या कामात अहिल्यानगर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कुलकर्णी म्हणाल्या…

“लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत आणि जनतेच्या कामांचा वेळेत निपटारा करण्यात अहिल्यानगर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमने दाखवलेल्या उत्कृष्ट ‘टीम वर्क’ला जाते.”
— श्रीमती चित्रा कुलकर्णी, राज्य सेवा आयुक्त (नाशिक विभाग)

नक्की वाचा : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन

सविस्तर चर्चा व आवश्यक मार्गदर्शन (Top in the state)

जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले असले, तरी हे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या दोन दिवसीय बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर मंथन करण्यात आले. ज्या विभागांच्या कामकाजाची टक्केवारी काहीशी कमी आहे, त्यांच्या कामाचा सखोल आढावा घेऊन ती वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.