Tree Plantation Campaign : मुख्यमंत्र्यांच्या तीनशे कोटी वृक्षलागवड अभियानात विद्यार्थी, नागरिक, संघटनांनी सहभागी व्हावे : पळसकर

तीनशे कोटी वृक्षलागवड योजना जाहीर

0
Tree Plantation Campaign : मुख्यमंत्र्यांच्या तीनशे कोटी वृक्षलागवड अभियानात विद्यार्थी, नागरिक, संघटनांनी सहभागी व्हावे : पळसकर
Tree Plantation Campaign : मुख्यमंत्र्यांच्या तीनशे कोटी वृक्षलागवड अभियानात विद्यार्थी, नागरिक, संघटनांनी सहभागी व्हावे : पळसकर

Tree Plantation Campaign : पारनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सातत्याने पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे (Dr. Anna Hazare) यांच्या सामाजिक विचारांचा आदर्श घेऊन काम करत असतात, त्यामुळे फडणवीस यांनी राज्यात तीनशे कोटी वृक्षलागवडचे (Tree Plantation Campaign) ध्येय ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या योजनेत विद्यार्थी,शाळासह सर्व नागरीक, संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी देवराम पळसकर यांनी केले.

नक्की वाचा : अहिल्यानगर येथे शुक्रवारपासून नरेंद्रजी फिरोदिया बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

अण्णा हजारे म्हणाले की

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ॲडवाटेंच पारनेर व पारनेर पब्लिक स्कूलच्या वतीने बीजारोपण व वृक्षारोपण अभियान शुभारंभ पद्मभूषण डॉ अण्णा हजारे व देवराम पळसकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अण्णा हजारे म्हणाले, देवराम पळसकर यांनी ॲडवाटेंच पारनेर च्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील डोंगराळ भागात बीजारोपण मोहीम राबविण्यासाठी युवकांना दिलेले पाठबळ महत्वाचे आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तीनशे कोटी वृक्षलागवड योजना जाहीर (Tree Plantation Campaign)

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी देवराम पळसकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनशे कोटी वृक्षलागवड योजना जाहीर केली आहे. आणि पारनेर तालुक्यात पद्मभूषण डॉ अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व बीजारोपण सोहळा होत आहे ही अभिमानाची बाब आहे. पक्षांना उपयोग होईल असे वृक्षलागवड आवश्यक आहे. पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, ॲडवाटेंच पारनेर व पारनेर पब्लिक स्कूल ने पद्मभूषण डॉ अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व बीजारोपण अभियान हे पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे आहे.आडवाटेंच पारनेर हे सातत्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.