Village Security System : नगर तालुक्यातील ४४ गावांची ग्रामसुरक्षा यंत्रणा झाली ठप्प; ती तात्काळ कार्यान्वित करण्याचे पोलिसांचे पत्र

Village Security System : नगर तालुक्यातील ४४ गावांची ग्रामसुरक्षा यंत्रणा झाली ठप्प; ती तात्काळ कार्यान्वित करण्याचे पोलिसांचे पत्र

0
Village Security System : नगर तालुक्यातील ४४ गावांची ग्रामसुरक्षा यंत्रणा झाली ठप्प; ती तात्काळ कार्यान्वित करण्याचे पोलिसांचे पत्र
Village Security System : नगर तालुक्यातील ४४ गावांची ग्रामसुरक्षा यंत्रणा झाली ठप्प; ती तात्काळ कार्यान्वित करण्याचे पोलिसांचे पत्र

Village Security System : नगर : नगर तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि आपत्तीच्या काळात नागरिकांना तात्काळ सतर्क करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ (Village Security System) सध्या अनेक गावांमध्ये बंद पडली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याच्या (Nagar Taluka Police Station) हद्दीतील एकूण ६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १९ ग्रामपंचायतींमध्ये ही यंत्रणा सुरू असून, उर्वरित तब्बल ४४ ग्रामपंचायतींमध्ये शासकीय रक्कम वेळेत न भरल्याने ही यंत्रणा ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी गटविकास अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच, प्रशासक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून थकीत रकमेचा भरणा करून ग्रामसुरक्षा यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याचे आवाहन केले आहे.

संभाव्य गुन्ह्यांना प्रभावीपणे आळा घालणे शक्य

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील सुरक्षिततेसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागात अनेक नागरिक आपल्या सोयीनुसार शेतात घर बांधून एकट्या वस्तीवर राहत आहेत. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता मालमत्तेची चोरी, दरोडा, जबरी चोरी, महिला व अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भात घडणारे गुन्हे, तसेच गंभीर अपघात आणि आगीच्या घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अशा संकटाच्या किंवा गुन्ह्याच्या वेळी एकाच कॉलवर संपूर्ण गावातील नागरिकांना एकाच वेळी माहिती मिळून ते सतर्क झाल्यास संभाव्य अनर्थ व गुन्ह्यांना प्रभावीपणे आळा घालता येऊ शकतो, असे पोलिसांनी पत्रात नमूद केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

‘या’ ४४ ग्रामपंचायतींना पाठवली पत्रे (Village Security System)

या यंत्रणेचे महत्त्व लक्षात घेऊन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी नगर तालुका पोलिसांनी केली आहे. या पत्राच्या प्रती संबंधित ४४ ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये अंबिलवाडी, अरणगाव, आठवड, बाबुर्डी घुमट, बाबुर्डी बेंद, बारदरी, भातोडी पारगाव, भोयरेपठार, बुरुडगाव, चिचोंडी पाटील, दशमीगव्हाण, देवगाव, देऊळगाव सिद्धी, गुणवडी, हिवरेझरे, हिवरेबाजार, कामरगाव, कौडगाव, खडकी, खांडके, कोल्हेवाडी, मदडगाव, मांडवे, माथणी, मठपिंप्री, मेहेकरी, नारायण डोह, नेप्ती, निमगाव वाघा, पारगाव भातोडी, पिंपळगाव लांडगा, राळेगण म्हसोबा, रांजणी, रतडगाव, सांडवे, सारोळा बद्दी, सारोळा कासार, शिराढोण, सोनेवाडी (पिं.लां), टाकळीकाझी, तांदळी वडगाव, उक्कडगाव, वडगाव तांदळी आणि वाटेफळ या गावांचा समावेश आहे.