Water storage : नगर : कमी पाऊस झाल्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ (Drought) जाहीर केलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या तीन मोठे प्रकल्प व सहा मध्यम असे एकूण नऊ प्रकल्प आहेत. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) धरणांमध्ये असलेला पाणीसाठा (Water storage) व त्याची सद्यस्थितीत जाहीर केली आहे.
नक्की वाचा : जिल्हा उपनिबंधकांच्या कारभाराविरोधात कास्ट्राईब महासंघाचे ढोल-ताशांच्या गजरात निदर्शने
जिल्ह्यात एकूण नऊ प्रकल्प
शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत अहिल्यानगरमध्ये सध्या 300 टँकरद्वारे 259 गावांना व 1563 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.. जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण नऊ प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये भंडारदरा, मुळा, निळवंडे या प्रकल्पाचा समावेश आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये आढळा, मांडओहळ, पारगाव घाटशीळ, सीना, खैरी, व विसापूर या प्रकल्पाचा समावेश आहे. पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार पाणीसाठा पुढील प्रमाणे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
धरणांची आकडेवारी (Water storage)
मोठे प्रकल्प
भंडारदरा धरण : एकूण पाणीसाठा 11039 दशलक्ष घनफूट, उपयुक्त पाणीसाठा 10739 दशलक्ष घनफूट, आजचा पाणीसाठा 9992 दशलक्ष घनफूट, शिल्लक पाणीसाठा 90.52 टक्के.
मुळा धरण : एकूण पाणीसाठा 26000 दशलक्ष घनफूट, उपयुक्त पाणीसाठा 21500 दशलक्ष घनफूट, आजचा पाणीसाठा 15836 दशलक्ष घनफूट, शिल्लक पाणीसाठा 60.91टक्के.
निळवंडे धरण : एकूण पाणीसाठा 8334 दशलक्ष घनफूट, उपयुक्त पाणीसाठा 8199 दशलक्ष घनफूट, आजचा पाणीसाठा 4420 दशलक्ष घनफूट, शिल्लक पाणीसाठा 53.04 टक्के.
मध्यम प्रकल्प
आढळा धरण : एकूण 1060 दशलक्ष घनफूट, उपयुक्त पाणीसाठा 975 दशलक्ष घनफूट, आजचा पाणीसाठा 928 दशलक्ष घनफूट, शिल्लक पाणीसाठा 87.55 टक्के.
मांडओहळ धरण : एकूण पाणीसाठा 399 दशलक्ष घनफूट, उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट, आजचा पाणीसाठा 64 दशलक्ष घनफूट, शिल्लक पाणीसाठा 15.93 टक्के.
पारगाव घाटशीळ धरण : एकूण पाणीसाठा 437 दशलक्ष घनफूट आहे यातील उपयुक्त पाणीसाठा 297दशलक्ष घनफूट तर आजच्या तारखेला या धरणात 0 पाणीसाठा शिल्लक आहे
सीना धरण : एकूण पाणीसाठा 2400 दशलक्ष घनफूट, उपयुक्त पाणीसाठा 1847 दशलक्ष घनफूट, आजचा पाणीसाठा 550 दशलक्ष घनफूट, शिल्लक पाणीसाठा 22.92 टक्के.
खैरी धरण : एकूण पाणीसाठा 533 दशलक्ष घनफूट, उपयुक्त पाणीसाठा 485 दशलक्ष घनफूट, आजचा पाणीसाठा 63 दशलक्ष घनफूट, शिल्लक पाणीसाठा 11.8 टक्के.
विसापूर धरण : एकूण पाणीसाठा 905 दशलक्ष घनफूट, उपयुक्त पाणीसाठा 905 दशलक्ष घनफूट, आजचा पाणीसाठा 525 दशलक्ष घनफूट , शिल्लक पाणीसाठा 58.01 टक्के.
दिलेल्या आकडेवारीनुसार सध्या मोठ्या प्रकल्पांमध्ये भंडारदरा धरणात सर्वाधिक (९०.५२टक्के) पाणीसाठा आहे, तर मध्यम प्रकल्पांमध्ये आढळा धरणात (८७.५५टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात कमी पाणीसाठा पारगांव घाटशिळ प्रकल्प पूर्णपणे कोरडा (०.००टक्के) तर, खैरी (११.८६टक्के) आणि मांडओहळ (१५.९३टक्के) या प्रकल्पांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात आत्ताच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्याच संकट तोंडावर आहे. पुढील पावसाळ्याला आणखी सात महिने बाकी आहेत. हा पाणीसाठा सात महिने पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे.



