Water Supply : कोपरगाव : एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहराचा पाणीपुरवठा 2 जुलै 2026 पासून सहा दिवसांआड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली आहे.
नक्की वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, अनावश्यक वापर करू नये, गळती असल्यास तातडीने दुरुस्ती करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पाण्याचा उपलब्ध साठा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आणि सर्व नागरिकांना समान प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही पहा : रिक्षा चालकाचा अनोखा उपक्रम; वृटपौर्णिमेसाठी महिलांना मदत
प्रशासनाला सहकार्य करा (Water Supply)
बदललेल्या नियोजनानुसार नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले. तसेच, पाण्याचा अपव्यय टाळावा, अनावश्यक वापर करू नये, गळती असल्यास तातडीने दुरुस्ती करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.



