
Water supply to Ahilyanagar city disrupted : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (AMC) शहर पाणी पुरवठा (Water supply to Ahilyanagar city disrupted) योजनेच्या उच्च दाब वीज वाहिनीवर विळद पंपीग स्टेशन परिसरात आज (ता. ६) पहाटे ४.०० वाजले पासून सकाळी ०७.१५ पर्यंत वीज पुरवठा खंडीत (Power Supply Interrupted) झालेला होता. त्यामुळे पाणी उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणाच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता आलेल्या नाहीत. त्यामुळे अहिल्यानगर शहरात आज काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तर काही भागात आज ऐवजी उद्या (ता. ७) पाणी पुरवठा होईल.
या भागाला उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा
रोटेशन नुसार आज (ता. ६) पाणी वाटप शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोटी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेटर परिसर, म्युनिसीपल हाडको आदी भागाला उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या भागात दि. ७ ला पुरवठा (Water supply to Ahilyanagar city disrupted)
तसेच बोल्हेगाव, नागापूर, पाईपलाईन रोड परिसर, ढवणवस्ती संपूर्ण परिसर, लेखानगर, संचारनगर या उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. या भागाला पाणी पुरवठा हा उद्या (ता. ७) करण्यात येईल. तरी नागरिकानी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


