
Work at Kothla Square halted due to a lack of coordination : नगर : यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळं नागरिकांच्या हिताची कामं कशी हाणून पडतात, याचं एक उदाहरण आज अहिल्यानगर शहरातील कोठला चौकात (Work at Kothla Square halted due to a lack of coordination) पहायला मिळालं. चौकात नेहमी होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam) फोडण्यासाठी तिथं प्रायोगिक तत्वावर बॅरीकेडस लावण्यात आले होते. हा प्रय़ोग यशस्वी झाल्यानंतर तिथं कायमस्वरूपी काँक्रिटचे दुभाजक बांधण्याचं काम बुधवारी सकाळी सुरू करण्यात आलं. मात्र, संबंधित यंत्रणांनी याची माहिती दिली नाही, या कारणावरून वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) तोंडी सूचनेवरून हे काम बंद करण्यात आलं. तिथं आणण्यात आलेलं साहित्यही कामगार परत घेऊन गेले. त्यामुळं आणखी काही काळ तरी या चौकातील वाहतूक समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.
नेप्ती चौकात असाच प्रयोग
अहिल्यानगर शहरातील नेप्ती चौक आणि कोठला चौक इथं सारखीच परिस्थिीती होती. काही दिवसांपूर्वी नेप्ती चौकात असाच प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर तिथं कायमस्वरूप दुभाजक बसविण्यात आले. आता तिथली वाहतूक सुरळीत झाली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कायम स्वरूपी दुभाजक तयार करण्याचं काम (Work at Kothla Square halted due to a lack of coordination)
असाच प्रयोग कोठला चौकात झाला. त्यालाही यश आलं. उड्डाणपूल होण्याआधी आणि झाल्यानंतरही कोठला चौकातील समस्या कायम होती. अलीकडंच तिथं लोखंडी कठडे उभारून वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं. त्यामुळं तिथंली वाहतूक काहीशी सुरऴीत झाली. हे पाहून तिथंही कायम स्वरूपी दुभाजक तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं. मात्र, आपल्याला कळविलं नाही, काम सुरू असताना वाहतुकीची कोंडी होईल, या कारणावरून पोलिसांनी ते काम बंद करायला सांगितल्याचं कळतं. त्यामुळं कामगार आणि कंत्राटदार तेथील साहित्य काढून घेऊन गेले.


