worship: अकोले: जलसंपदा विभागाच्यावतीने ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’निमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत प्रवरा नदीच्या पवित्र जलाच्या कलशाचे विधिवत पूजन (worship) करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गोदावरी ते नर्मदा नदी खोऱ्यातील विविध नद्यांचे पवित्र जल कलशामध्ये संकलित करून त्याचे पूजन करण्यात येत असून हे कलश पुढे महेश्वर येथे नर्मदा नदीत अर्पण केले जाणार आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून प्रवरा नदीच्या पवित्र जलाच्या कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर हा कलश पुढील प्रवासासाठी सुपूर्त करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी जलसंवर्धनाचा संदेश देत उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
अवश्य वाचा- जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा : जिल्हाधिकारी
स्थानिक नागरिकांचा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद (worship)
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात जलव्यवस्थापनाला विशेष प्राधान्य दिले होते. त्यांनी आड, बारव, घाट, विहिरी, तळी आणि नदीकाठावरील विविध पायाभूत सुविधा उभारून पाण्याचा सुयोग्य वापर आणि संवर्धनाचा आदर्श घालून दिला होता. सदर उपक्रम जलसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करत असतानाच आपल्या समृद्ध परंपरेची जाणीव करून देणारा ठरत आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



