Yoga Day : उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील

0
Yoga Day : उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील
Yoga Day : उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील

Yoga Day : नगर : केंद्रीय संचार ब्यूरो, माजी सैनिक आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान आणि सूर्यतेज संस्थेच्या वतीने सोमैया विद्या मंदिर येथे योग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. योग ही भारताने विश्वाला दिलेली अमूल्य देणगी असून उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून दररोज योगाभ्यास करावा आणि मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले.

हेही वाचा : गांधी मैदान परिसरात तरुणावर चाकू हल्ला; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

येथे आयोजन

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, अहिल्यानगर यांच्या वतीने माजी सैनिक कै. आर. बी. तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत आणि सूर्यतेज संस्था, कोपरगाव यांच्या विशेष सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमैया विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी येथे योग प्रशिक्षण कार्यक्रम व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नक्की पहा : खासदार नीलेश लंके यांचा वाघासोबत फेरफटका

यांची उपस्थिती (Yoga Day)

या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, सूर्यतेज संस्थेचे संस्थापक तथा स्वच्छतादूत सुशांत घोडके, केंद्रीय संचार ब्यूरोचे बबलूकुमार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास पाचपाटील, मुख्याध्यापक संजय राऊत, योगतज्ञ प्रशिक्षक संतोष नलगे, महेश थोरात, रोहित काळे, पर्यवेक्षक बाबासाहेब खळदकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.