8th Pay Commission : नगर : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची पाऊले उचलली जात आहे. आता आठव्या वेतन आयोगासाठी तीन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपसचिव अभय एन. सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
हेही वाचा : रहाट पाळण्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा; ससाणे यांचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश
‘या’ मुद्द्यांवर चर्चा
दिल्लीतील या बैठकीत कर्मचारी संघटना आणि युनियनच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत ३ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. हा फिटमेंट फॅक्टर ३.२५ किंवा त्यापेक्षा जास्त करण्याची मागणी केली जात आहे. फिटमेंट फॅक्टरवर मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होईल. निवृत्तीवेतन आणि भत्ते- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांबाबत शिफारसीदेखील तयार केल्या जातील.
नक्की पहा : वाहतूक सुरळीत करण्यासाठी खासदार निलेश लंके रस्त्यावर
आयोगाकडे १८ महिन्यांचा वेळ (8th Pay Commission)
सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. अर्थ मंत्रालयाचे राज्य मंत्री पंकज चौधरी यांच्या म्हणण्यांनुसार, आयोगाकडे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आहे. सध्या आयोग राज्यांचा दौरा करत असून संबंधित घटकांकडून माहिती गोळा करत आहे. १२ मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर ही तीन दिवसीय बैठक खूप महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीत संयुक्त सांमजस्य कराराला अंतिम स्वरुप दिले जाऊ शकते.



