Karan Sasane : रहाट पाळण्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा; ससाणे यांचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश

कंत्राटी कामगारांची थकीत रक्कम देण्यास सभेत मंजूरी

0
Karan Sasane : रहाट पाळण्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा; ससाणे यांचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश
Karan Sasane : रहाट पाळण्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा; ससाणे यांचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश

Karan Sasane : श्रीरामपूर : श्रीरामनवमी यात्रेनिमित्त (Shri Ram Navami Yatra) रहाट पाळण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदाराने धनादेश (Cheque) न वटल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच कारवाईस विलंब केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटिस बजवावी, असा आदेश नगराध्यक्ष करण ससाणे (Karan Sasane) यांनी आज (ता. २९) झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना दिला.

नक्की वाचा : पाईपलाईन रोड परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

१० टक्के कपात

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. उपनगराध्यक्षा कांचन सानप, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व्यासपीठावर उपस्थित होते. सभेत दैनंदिन व आठवडे बाजार वसुलीचा ठेका देण्याच्या विषयावर चर्चा करताना ३२ लाख रुपये ठेक्याची रक्कम निश्चित करण्यात आली होती. दोन तीन वेळा मुदतवाढ देऊनही कोणी ठेका घेतला नाही. त्यामुळे १० टक्के कपात करून ही रकम २८ लाख करण्यास सभेत मंजूरी देण्यात आली. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तत्काळ कारवाई करण्याचे आदेश (Karan Sasane)

या विषयास अनुसरून नगरसेवक मुजफफर शेख यांनी श्रीरामनवमी यात्रेतील पाळण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदारकडून किती रक्कम जमा झाली? उर्वरित रक्कम वसुलीसाठी काय प्रयत्न केले ? असे प्रश्न केले असता ५८ लाख रुपयांना हा ठेका देण्यात आला होता. त्यापैकी २८ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित रकमेचे धनादेश बँकेत वटले नाहीत. संबंधीतास नोटिस पाठवण्यात आली आहे, अशी माहिती दिली. त्यावर धनादेश वाटले नाही तर गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल करत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मुजफ्फर शेख यांनी केली. त्यावर ठेकेदार व अधिकारी यांच्या विरोधात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिला.

ससाणे म्हणाले की

श्रीरामनवमी हा गावचा उत्सव आहे, नागरिकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे, पालिकेने याकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहू नये, या ठेक्याची रक्कम कमी करावी अशी सुचना मुजफ्फर शेख यांनी केली. त्यास सदस्य श्रीनिवास बिहाणी यांनी सहमती दर्शविली. पुढील सभेत विषय पत्रिकेत याचा समावेश करू,असे ससाणे म्हणाले. प्रभाग २ मध्ये आठवडे बाजार भरत असून त्यास पालिकेने परवानगी दिली काय, असा प्रश्न दीपक चव्हाण यांनी केला असता शहरातील आठवडे बाजार विस्तारत आहे. अनेक रस्त्यांवर तो भरत आहे. व्यापारी, शेतकरी आपला माल घेऊन येतात, त्यांची संख्या निश्चित नसते, असे ससाणे म्हणाले. सभेत संतोष कांबळे, वैशाली चव्हाण, आशा रासकर, स्नेहल खोरे, राजेंद्र पवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली. 

कामगारांची थकीत रक्कम देण्यास सभेत मंजूरी

दहाव्याच्या ओट्याच्या ठिकाणी वॉचमन नियुक्तीस तसेच बांधकाम विभागाच्या प्राप्त टिपणीतील कंत्राटी कामगारांची थकीत रक्कम देण्यास सभेत मंजूरी देण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य नगरपालिका सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेविका स्नेहल केतन खोरेंनी सत्ताधारी काँग्रेसला धारेवर धरत नगरपालिका कर्मचाऱ्यांना वॉर्ड नंबर २ मध्ये मारहाण झाली तर त्याचा साधा निषेध नगराध्यक्षांसह सत्ताधारी करू शकले नाही,असे सुनावत नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे सभागृहाचे काम असल्याचे मत व्यक्त केले.