Rasrang Misal : रसरंग मिसळचे संस्थापक रामशेठ दायमा यांचे निधन

Rasrang Misal : रसरंग मिसळचे संस्थापक रामशेठ दायमा यांचे निधन

0
Rasrang Misal : रसरंग मिसळचे संस्थापक रामशेठ दायमा यांचे निधन
Rasrang Misal : रसरंग मिसळचे संस्थापक रामशेठ दायमा यांचे निधन

Rasrang Misal : नगर : अहिल्यानगरमधील रसरंग मिसळचे संस्थापक रामशेठ दायमा (वय ८६) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दायमा यांनी १९६७ मध्ये आडतेबाजारात मिसळचे हॉटेल सुरू केले. सुरूवातीला त्यांच्या नावाने ओळख असलेल्या या हॉटेलचे नाव पुढे रसरंग मिसळ झाले. 

हेही वाचा : सोशल मीडियावर एआय फोटोंच्या माध्यमातून बदनामी; सायबर पोलिसांत फिर्याद

श्रमिकांसाठी प्रसिद्ध मिसळ

आडतेबाजारातील श्रमिकांसाठी म्हणून सुरू केलेली ही मिसळ पुढे खूपच प्रसिद्ध झाली. आता ती अहिल्यानगरची ओळख बनली असून विविध ठिकाणाहून लोक ही मिसळ खाण्यासाठी येतात. अलीकडेच रसरंगचा शाखा विस्तार झाला. सावेडी उपनगरात मनमाड रोडवर रसरंगची शाखा सुरू झाली. रामशेठ कडक शिस्तीचे. त्यांनी हा व्यवसाय तेवढाच सचोटीने केला. चवीत फरक पडू नये, ग्राहकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी ते अग्रही असत. 

नक्की पहा : दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पोटनिवडणुकीत पराभव

आपुलकीचा संवाद (Rasrang Misal)

या वयातही ते आडतेबाजारच्या मूळ शाखेत गल्ल्यावर बसत. नवखे ग्राहक दिसल्यावर त्यांच्याकडे चवीबद्दल हमखास प्रतिक्रिया विचारत. ओळखीच्या ग्राहकांशी त्यांचा संवाद असे, पण त्यात ते फारसे अडकून पडत नसत. रसरंगची मिसळ खाणे हा एक वेगळा अनुभव असतो, तसाच बिल देताना दायमाशेठ सोबतचा संवाद आणि त्यांनी केलेला पै पै चा हिशोब हाही एक वेगळा अनुभव असतो.