Radhakrishna Vikhe Patil | नगर : संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. राजकारणात त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ते जे सांगत आहेत, त्याला लोकमान्यता मिळत नाही, हे लक्षात येऊनही ते का बोलतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, ही त्याची प्रचिती आहे, असे प्रत्युत्तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिले.
हेही वाचा – सुटीवर आलेल्या लष्करी जवानाचा भीषण अपघातात मृत्यू
सर्वपक्षीय सभा आयोजित (Radhakrishna Vikhe Patil)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अपघाताविषयी खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच काही गंभीर आरोपही केली. अजित पवार यांचा अस्थिकलश आज (ता. २) अहिल्यानगर शहरात आला होता. या निमित्त अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
अवश्य वाचा – सोने, चांदी, पैसे दान करण्याबरोबरच नेत्रदान करण्याचा नवीन पायंडा
गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही त्यांची जवळीक (Radhakrishna Vikhe Patil)
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुतीमध्ये अजित पवारांनी येणे ही सर्वांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. २०२४च्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही सत्तेत आलो. त्यांच्यावर मला नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव दिसून आला. गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही त्यांची जवळीक राहिली. मंत्रिमंडळात काम करताना, राज्यात निर्णय घेताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अजित पवार यांच्या विषयी विशेष प्रेम दिसून आले. त्यांनी विकास प्रक्रियेत नेहमीच अजित पवार यांना बरोबर घेतले. अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या अपघाताची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



