नगर: नेवासा तालुक्यातील (Newasa News) सौंदाळा ग्रामपंचायतने (Saundala Gram Panchayat) एक ऐतिहासिक निर्णय (Historic Decision) घेतला आहे. या गावात सकाळी १० वाजता लाऊडस्पीकरवर राष्ट्रगीत (National Anthem) लावण्यात येत आहे. गावातील सर्व नागरिकांना राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहून देशाचा सन्मान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयानुसार,नागरिक देखील या आदेशाचे पालन करताना पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा: आता राष्ट्रवादीचा दादा कोण? राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार?
शिवी दिल्यास ५०० रु दंड करणारी भारतातील पहिली ग्रामपंचायत (Newasa News)

सौंदाळा गाव हे नेहमीच समाज हिताचे अभिनव उपक्रम राबवते. शिवी दिल्यास ५०० रु दंड करणारी भारतातील पहिली ग्रामपंचायत तसेच विधवा सन्मानासाठी विविध निर्णय अशा उपक्रमाने सौंदाळा ग्रामपंचायत प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. यावेळी “राष्ट्र प्रथम” हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजला पाहिजे, आपण या किंवा त्या जातीचे आहोत हे महत्वाचे नसुन भारत मातेचे सर्व सुपुत्र आहोत, ही भावना भारतीयांच्या मनामनात खोलवर रुजावी म्हणून गावात दररोज राष्ट्रगीत लावुन ग्रामस्थांना प्रेरित करणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले.
अवश्य वाचा: देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच का सादर केला जातो? जाणून घ्या…
गावाच्या निर्णयामुळे देशप्रेमाची भावना वाढीला लागणार (Newasa News)

गावाने घेतलेल्या या निर्णयामुळे गावातील सर्वांच्या मनात देशप्रेम निर्माण होऊन दररोज देशाच्या प्रती सन्मान करण्याची संधी निर्माण होईल आणि लहान मुलांना देखील एक देश प्रेमाचे संस्कार होतील. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल,असे ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सांगितले आहे. या उपक्रमामुळे गावातील सामाजिक समरसता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल,अशी अपेक्षा आहे. गावातील शाळांमध्येही राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहून सन्मान करण्याचे आवाहन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले आहे. या निर्णयाचे गावातील नागरिकांनी स्वागत केले असून, हा निर्णय देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल,असे मत व्यक्त केले आहे.

“या उपक्रमामुळे देशातील जातीयवाद संपून देश अखंड राहील आणि सर्व नागरिकांमध्ये एकता आणि समरसता निर्माण होईल,”असे ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सांगितले. ग्रामपंचायतच्या या निर्णयाला गावातील विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक संस्थांनी समर्थन दर्शविले आहे.



