
Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत महापौर व उपमहापौर पदांची निवड प्रक्रिया आज (ता. ६) जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योती अमोल गाडे (Jyoti Amol Gade), तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर
सर्व नगरसेवक, अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
महापौर पदासाठी सूचक नगरसेवक गणेश भोसले आणि अनुमोदन नगरसेवक अविनाश घुले, तर उपमहापौर पदासाठी सूचक निखिल वारे आणि अनुमोदन कुमार वाकळे यांनी प्रस्ताव मांडला. निवड प्रक्रिया शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहर लहारे, तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा: दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, (Ahilyanagar Municipal Corporation)
“महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य केल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल. पार्किंग व वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न गंभीर असून त्यावर जिल्हा प्रशासन, आरटीओ आणि महापालिका यांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवाव्यात. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्स हटवावेत, जेणेकरून नागरिकांमध्ये चांगला संदेश जाईल. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नगरकरांचा विश्वास संपादन करणारे काम उभे करावे,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
नूतन महापौर ज्योती गाडे म्हणलया, (Ahilyanagar Municipal Corporation)
“आजपासूनच कार्याची सुरुवात करत असून शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावर आधारित विकासाचा आराखडा उभा करू,” असे त्या म्हणाल्या.
उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले, (Ahilyanagar Municipal Corporation)
“महापौर ज्योती गाडे व आम्ही सर्वजण एकत्र येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन लोकाभिमुख निर्णय घेत नगरकरांची सेवा करणे, हीच माझी प्राथमिकता असेल,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सर्व नगरसेवकांचे व नागरिकांचे आभार मानले तसेच सभागृहाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजलीही वाहिली.

यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेविका शितल जगताप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, संपत बारस्कर, कुमार वाकळे, अविनाश घुले, मनोज कोतकर, डॉ. सागर बोरुडे, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, महेश तवले, बाळी पांगरे, दत्ता गाडळकर, महेश लोंढे, ऋग्वेद गंधे, मनोज दुल्लम, सुभाष लोंढे, विजय पठारे, अमोल येवले, मोहित पंजाबी, तसेच नगरसेविका दिपाली बारस्कर, पुष्पा बोरुडे, शारदा ढवण, संध्या पवार, गीतांजली काळे, कांताबाई शिंदे, आशा डागवले आणि दत्ता कावरे, श्रीपाद छिंदम, नवनाथ कातोरे आदी उपस्थित होते.


