Tourist : पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास होणार कारवाई

Tourist : पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास होणार कारवाई

0
Tourist : पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास होणार कारवाई
Tourist : पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास होणार कारवाई

Tourist : नगर : जगभरातील पर्यटकांना (Tourist) आकर्षण असलेले ठिकाण म्हणजे गोवा (Goa), या गोव्यामध्ये समुद्रकिनाऱ्यांवर (Beach) विदेशी महिलेला टवाळखोरांकडून फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिला जातो. अशा हुल्लडबाजांना आता पोलिसांकडून (Police) ताब्यात घेतले जाणार आहे. गोव्यात विदेशी अथवा देशी पर्यटकांचा आता परवानगीशिवाय फोटो किंवा सेल्फी काढता येणार नसल्याचे पोलिसांनी बजावले आहे.

हेही वाचा – अजित दादांची खुर्ची पाहताच सुनेत्रा पवार भावूक; राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारला कार्यभार

दोघांना घेतले ताब्यात

गेल्या आठवड्यात उत्तर गोव्यातील बागा समुद्रकिनाऱ्यावर तामिळनाडूच्या काही टवाळखोरांनी विदेशी पर्यटकांनी फोटोसाठी त्रास दिला. विदेशी महिला पर्यटकांनी परवानगी दिली नसताना त्यांना फोटो, सेल्फीसाठी त्रास दिला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १७० अंतर्गत चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले.

हे पहा – भाषेची अस्मिता म्हणजे आजार? राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर तिखट वार

समुद्रात आंघोळ करणाऱ्या विदेशी पर्यटक महिलेचा व्हिडिओ (Tourist)

कळंगुटमध्ये विदेशी पर्यटक महिला समुद्रात आंघोळ करत असताना तिचे चित्रीकरण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. “संशयिताने पर्यटक महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. संशयिताने राज्यातील पर्यटनाला धक्का लावण्यासह, महिलेची बदनामी केली”, असे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. संशयिताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करुन त्याला ताब्यात घेतले होते.

समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांनी सुरक्षा वाढविली
पर्यटकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पर्यटकांना त्रास झाल्यास देशाची व पर्यटन स्थळाची नाहक बदनामी होऊ शकते. तसेच यामुळे पर्यटनावर परिणाम होऊन विदेशी पर्यटक येणे कमी होईल. यासर्व कारणांमुळे स्थानिक बाजारपेठेवर व रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालण्याचे प्रमाण वाढवले आहे. पर्यटन हंगाम सुरु होताच उघडकीस आलेल्या या दोन घटनांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.