Confidance| आत्मविश्‍वास सातासमुद्रापार नेऊ शकतो: काळे

Confidance| आत्मविश्‍वास सातासमुद्रापार नेऊ शकतो: काळे

0

Confidance| अकोले: आपली सुरुवात अथवा आयुष्याचा प्रारंभ ही मर्यादा नसावी, स्वप्नांसाठी जागे रहा. पाठपुरावा करा. न्यूनगंड काढून टाकावा. आत्मविश्‍वास (Confidance) सातासमुद्रापार नेऊ शकतो. प्रवास खडतर असतो, सोपे काहीच नसते, असे प्रतिपादन ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिकाचे उपाध्यक्ष रोहित काळे यांनी केले.  
अकोलेतील अगस्ति महाविद्यालयाच्या ५० व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण (Symposium and prize distribution) समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्‍वस्त गिरजाजी जाधव होते.  

अवश्य वाचा- स्वीकृत नगरसेवकांचा फॉर्म्युला ठरला; गटनेते कोणाची शिफारस करणार

आपणाशीच स्पर्धा करावी (Confidance)


काळे म्हणाले, प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे, आपणाशीच स्पर्धा करावी. स्वतःला खंबीर करणे हेच आयुष्याचे गमक आहे. आपल्या तारूण्यातील भरारी आपल्या भारताची ताकद आहे. तुमच्यात भारताचे भवितव्य पाहतो. एआयची लाट असली तरी लाटेच्या वर रहा. कार्यक्षमता वाढविण्यासाठी आत्मविकास जरुरीचा आहे. आजचा काळ उभारणीचा आहे. भारतीय लोक अनेक क्षेत्रात पुढे आहेत ही अभिमानाची बाब असे ते म्हणाले. विख्यात गायक आणि युट्युबर गुर आशिषपाल सिंह यांनी आत्मिक ज्ञान तोलामोलाचे असते असे सांगून अगस्ति मुनींनी चिंता मुक्तीची शिकवण जगाला देऊन आध्यात्मिक बळ दिले असे सांगितले. शिक्षण अभ्यासक दीपा नायर यांनी आत्मविश्‍वास तसेच परिश्रमाचे महत्व विशद केले.

नक्की वाचा- अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी?

स्टुडंट्स ऑफ दि इयर करिष्मा मधे हिला प्रदान (Confidance)

प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. स्टुडंट्स ऑफ दि इयर वरिष्ठ महाविद्यालयातील करिष्मा नवनाथ मधे हिला तर कनिष्ठ महाविद्यालयातून दर्शन चौधरी याला प्रदान करण्यात आला. याशिवाय वर्षभर विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी स्वीकृत विश्‍वस्त संपत वैद्य, अध्यक्ष सुनील दातीर, खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणी सदस्य रमेश जगताप, शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य आर. डी. पल्हाडे, उपप्राचार्य डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. अशोक दातीर, प्रा. चांगदेव डोंगरे, प्रा. व्ही. व्ही. वाकचौरे, डॉ. सुनील शिंदे, परफेक्टच्या प्राचार्या मीना नवले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. महेजबीन सय्यद, प्रा. एन. टी. आरोटे आणि प्रा. के. व्ही. जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here