Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana : नगर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील (Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana) जिल्ह्यात ११ हजार मुलांचे अनुदान एप्रिल २०२५पासून थांबले आहे. अनाथ, निराधार व एकल पालकांच्या मुलांच्या (Orphans, Destitute and Single Children) संगोपनासाठी असलेली ही महत्त्वाची योजना प्रशासकीय उदासीनतेमुळे (Administrative Apathy) रखडली असून, लाभार्थ्यांच्या खात्यात आजतागायत एक रुपयाही जमा झालेला नाही.
अवश्य वाचा: बांगलादेशी कामगार आढळल्यास कामावर ठेवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
अनुदान थांबल्याने अनेक कुटुंबे मोडीत निघण्याच्या मार्गावर
महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ही योजना संस्थाबाह्य संगोपनाची असून, मुलांना अनाथाश्रमात ढकलण्याऐवजी कुटुंबातच शिक्षण, आरोग्य व पोषण मिळावे, हा तिचा गाभा आहे. मात्र, अनुदान थांबल्याने अनेक कुटुंबे मोडीत निघण्याच्या मार्गावर आहेत. शाळेची फी, वह्या-पुस्तके, औषधे, पोषण आहार सर्व काही थांबले आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून थेट लाभ हस्तांतर प्रणालीचा प्रचार केला जातो. तरीही बालसंगोपन योजनेचा पैसा थेट मुलांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून अनुदान रखडले आहे.
हे देखील पहा : अहिल्यानगरच्या कोठला भागात गोळीबार; एक युवक जखमी
गेल्या दहा महिन्यांपासून अनुदान नाही (Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana)
जिल्ह्यात ११ हजार मुलांना या अनुदानाचा लाभ मिळतो. प्रत्येकी दोन हजार २५० प्रमाणे दरमहिन्याला अनुदान वितरित होते. मात्र, शासनाकडून दर सहा महिन्यांनी अनुदान देण्यात येते. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून अनुदान आलेले नाही. लोकप्रिय योजनांना प्राधान्य देताना मूलभूत बालहक्कांवरच गदा आणली जात आहे. बाल न्याय अधिनियमाच्या भावनेला हरताळ फासणारी ही स्थिती असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे
शासनाने त्वरित अनुदान द्यायला हवे, अशी मागणी ही होत आहे.



