Bacchu kadu on bjp : ‘भाजप म्हटलं की संशय येतो. त्यांनी खांद्यावर हात टाकलं तरी लोक म्हणतात हा मेला. ती सापासारखी लोक आहेत. भाजप म्हणजे विषारी साप(BJP is a poisonous snake) आहे. भाजपसोबत दुश्मनी पण नाही दोस्ती पण नाही. हम तो दुश्मनी कर चुके है, ते कधीही नाग पाठवू शकतात’ असं वक्तव्य करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu kadu on BJP) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
नक्की वाचा: ‘राहुल गांधींची खासदारकी रद्द करा’; भाजप खासदाराची लोकसभेत मागणी
‘वेळ आल्यावर आम्ही कानफटात मारू’ (Bacchu kadu on BJP)

बच्चू कडू पुढे म्हणाले की, पूर्वी सिविल सर्जनला औषध घेण्याचे अधिकार होते. आता सगळे औषधी घेण्याचे अधिकार मंत्रालयात ठेवलेत. लावला गेम बरोबर कमिशन खा, औषध महाग करा. न खाऊंगा ना खाने दूंगा, सबसे ज्यादा देश के अंदर खाने वाला है तो बीजेपी है. टेंडर देण्यासाठी पैसे खाते. एमआरइजीएसचे पैसे अजून भेटले नाही. लाडकी बहिणीचे पैसे महिन्याचे पैसे भेटले नाही. अपंगाचे पगार वेळेवर नाही. ज्याला दोन पाय नाही साले हो त्याचे पगार वेळेवर देत नाही. तुमच्या कुठं माराव रे,माराची वेळ नाही आली आता.आम्ही पाहतोय वेळ आली तर मारू कानफटात. अशा प्रखर शब्दात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
अवश्य वाचा: ‘मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहू’- धनंजय मुंडे
लाडकी बहिण योजनेवर काय म्हणाले? (Bacchu kadu on BJP)
लाडक्या बहिणीच्या नावानं पंधराशे रुपये टाकून मतं भेटले. पण स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुमचे पैसे किती लुबाडले याच गणित लावावे लागेल. इकडून पैसे दिले आणि मीटरच्या माध्यमातून सरकारन पैसे घेतले. कर्जमाफी भेटली नाही तर महाराष्ट्रात रेल्वेचा चाक धावू देणार नाही. आम्ही गनिमी कावा करू, कामगाराला काढलं तर काय कामगार न्यायालयात जा.चार चार वर्षे रिझल्ट लागत नाही. कोर्टाचे काय हाल आहेत सर्वांना माहीत आहे. कोर्ट आपल्या बाजूने राहिल का नाही याची भीती वाटते, असे बच्चू कडू म्हणाले.



