Gram Panchayat : कोळगावचा कारभार इतर ग्रामपंचायतींसाठी ‘दीपस्तंभ’;  आनंद भंडारी यांच्याकडून कौतुक

Gram Panchayat : कोळगावचा कारभार इतर ग्रामपंचायतींसाठी 'दीपस्तंभ'; आनंद भंडारी यांच्याकडून कौतुक

0
Gram Panchayat : कोळगावचा कारभार इतर ग्रामपंचायतींसाठी 'दीपस्तंभ'; आनंद भंडारी यांच्याकडून कौतुक
Gram Panchayat : कोळगावचा कारभार इतर ग्रामपंचायतींसाठी 'दीपस्तंभ'; आनंद भंडारी यांच्याकडून कौतुक

Gram Panchayat : श्रीगोंदा : ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) राबवलेले कल्पक उपक्रम, शाश्वत जलसंधारण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांची पाहणी करून त्यांनी कोळगावचा कारभार इतर ग्रामपंचायतींसाठी ‘दीपस्तंभ’ असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांनी काढले. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Chief Minister Samriddhi Panchayat Raj Abhiyan)‘ अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीला आनंद भंडारी यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.

अवश्य वाचा: आत्मनिर्भर असणे सुंदर असण्यापेक्षा जास्त महत्वाचे:  डॉ. भाग्यश्री टिळेकर

इतर ग्रामपंचायतींनी कोळगावचा आदर्श घ्यावा

भेटीदरम्यान भंडारी यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक नियोजनावर विशेष समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “कोळगाव ग्रामपंचायतीने स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी जे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत, ते वाखाणण्याजोगे आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतीच्या विकासासाठी स्वावलंबी होणे गरजेचे असते आणि कोळगावने त्या दिशेने टाकलेली पावले कौतुकास्पद आहेत.  इतर ग्रामपंचायतींनीही कोळगावचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी करण्यात आलेले वृक्षारोपण आणि नदीवर बांधलेले सिमेंट साखळी बंधारे यामुळे गावातील जलपातळी वाढण्यास मदत झाली आहे. या जलसंधारणाच्या कामामुळे शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला मोठा आधार मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले. 

नक्की वाचा: स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक योगदान महत्वाचे : डॉ. विलास खर्चे

अद्ययावत सुविधांची पाहणी (Gram Panchayat)

गावातील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता आणि इतर शासकीय कार्यालयांच्या अद्ययावत सुविधांची पाहणी केली. आपले सरकार सेवा केंद्रा’च्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक लोकाभिमुख कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुका आणि जिल्हा स्तरावर मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत कोळगाव ग्रामपंचायतीला मोठी संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि गाव अधिक समृद्ध करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचे आवाहन भंडारी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केले. यावेळी गटविकास अधिकारी राणी फराटे, सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच विलास शितोळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.