Pune Rain Alert: उन्हाळ्याची चाहूल लागताच पुण्यात पावसाच्या सरी बरसणार;काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज ?

0
Pune Rain Alert: उन्हाळ्याची चाहूल लागताच पुण्यात पावसाच्या सरी बरसणार;काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज ?
Pune Rain Alert: उन्हाळ्याची चाहूल लागताच पुण्यात पावसाच्या सरी बरसणार;काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज ?

दक्षिण भारतावर पावसाचे संकट नगर : राज्यात किमान तापमानात वाढ (Temperature increase) झाल्याने गुलाबी थंडी ही कमी झाली आहे. त्यामुळे आता तापमानात उकाडा जाणवत आहे. मुंबईसह अनेक भागात उष्णतेची लाट आल्याने जाणवत आहे तर दुसरीकडे पुण्यात पावसाच्या हलक्या सरी (Pune Rain Alert) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD)वर्तवली आहे. सततच्या हवामान बदलामुळे नागरिकांना मात्र वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागत आहे.

नक्की वाचा: “दादा,आता त्या विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण कायम राहील”;अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन निमित्त भावनिक पत्र

पुण्यात ढगाळ वातावरणासह पाऊस (Pune Rain Alert)

हवामानाच्या अंदाजानुसार,अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आता हा पाऊस मुसळधार नसला, तरी फेब्रुवारीतील हा बदल पिकांसाठी आणि वाढत्या तापमानासाठी महत्त्वाचा असतो. काल गुरुवारी(ता. १२) धुळे, परभणी आणि जेऊर येथे राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. १३) किमान तापमान स्थिर राहणार असून, कोकणात उष्ण व दमट हवामान, तर पुण्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अवश्य वाचा: भाजप म्हणजे विषारी साप!कधीही नाग पाठवू शकतात;बच्चू कडू यांची जहरी टीका 

दक्षिण भारतावर पावसाचे संकट   (Pune Rain Alert)

महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असली, तरी दक्षिण भारतात मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्याचे रूपांतर ‘वेल मार्क लो प्रेशर’मध्ये होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक तडाखा तामिळनाडू आणि श्रीलंका या भागांना बसेल. १७ आणि १८ फेब्रुवारीला तामिळनाडूच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये आणि केरळमध्ये ६० ते ८० मिमी पावसाची शक्यता असून, तिथे पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.