LCB : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंशय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंशय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
LCB : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंशय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
LCB : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंशय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB : नगर : कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने केली आहे. संशयित आरोपींकडून (Accused) एक लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे गावच्या शिवारात भैलुमेवस्ती येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काही गोवंशीय जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन मोकळ्या शेतात झाडाला डांबुन ठेवलेले असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळाली त्यानुसार पथकाने जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सात गोवंशीय जनावरे आढळून आली. त्यांची सुटका करून एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हे पहा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम

यांच्या पथकाने केली कारवाई (LCB)

याबाबत कर्जत पोलीस ठाणे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संदीप मुरकुटे, विजय पवार, रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली.