Prajakt Tanpure : आगामी काळात आणखी मोठे प्रकल्प राबविणार : प्राजक्त तनपुरे

Prajakt Tanpure : आगामी काळात आणखी मोठे प्रकल्प राबविणार : प्राजक्त तनपुरे

0
Prajakt Tanpure : आगामी काळात आणखी मोठे प्रकल्प राबविणार : प्राजक्त तनपुरे
Prajakt Tanpure : आगामी काळात आणखी मोठे प्रकल्प राबविणार : प्राजक्त तनपुरे

Prajakt Tanpure : राहुरी : राहुरी शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असून आगामी काळात आणखी मोठे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) दिली. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, सौरऊर्जा प्रकल्प तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाच्या विविध योजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. राहुरी शहरात जॉगिंग ट्रॅक असलेला रस्ता, जुना कनगर रोड यांसह अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर नगरपालिकेला महावितरणचे (Mahavitaran) मोठे वीजबिल भरावे लागत असल्याने त्यावर उपाय म्हणून सुमारे अडीचशे किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा : नगर-दौंड महामार्गसह श्रीगोंदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

वीजबिलाची होणार बचत

हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दरमहा सुमारे पाच ते सहा लाख रुपये वीजबिलाची बचत होणार आहे. नागरिकांवर कोणत्याही प्रकारे कर किंवा पाणीपट्टी वाढीचा भार येणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला.दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत १५५ नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नगराध्यक्ष शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून दररोज सकाळी सात वाजता सायरन वाजविण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली. या योजनेची राज्यभर चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निधीची मागणी (Prajakt Tanpure)

राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज  यांचाही पूर्णाकृती पुतळा उभारण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जुना सरकारी दवाखाना चौकाचे नामांतर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक असे करण्यात येणार आहे.जैन आणि ख्रिश्चन समाजासाठी मंदिर उभारणीसाठी वांबोरी आणि राहुरी येथे दोन कोटी रुपयांच्या निधीची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एकनाथ नगर येथे ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

अडीचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला

राहुरी नगर परिषद हद्दीत रस्ते विकासासाठी सुमारे 130 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे तसेच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागितल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आपल्या आमदारकीच्या काळात निळवंडे धरण प्रकल्पासाठी पश्चिम भागासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी राहुरी तालुक्यात आणल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना अधिक वीज आणि पाण्याची सुविधा मिळावी यासाठीही विविध प्रकल्प राबविले असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेणार

आगामी पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितले. “कार्यकर्त्यांशी आमचे घरचे नाते आहे. त्यांच्या भावना आणि मत जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय प्रवास ठरवू,” असे ते म्हणाले.राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सौर कृषी योजनाही राबविली जात असून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.