Sangram Jagtap | आम्ही निवडणुकीच्या तयारीत; आमदार संग्राम जगताप यांचे सूचक वक्तव्य

0
Sangram Jagtap
Sangram Jagtap

Sangram Jagtap | नगर : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (ता. १५) पत्रकार परिषद घेत राहुरी व बारामती विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर केली. त्यानंतर राहुरी विधानसभा मतदार संघात राजकीय वातावरण तापले. भाजपकडून अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांचे नाव निश्चित असल्याचे सांगितले जात असतानाच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच केले आहे. या निवडणुकीबाबत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सूचक वक्तव्य केले.

हेही वाचा – राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक

रिक्त जागेवर पोटनिवडणूक

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली होती. तेथे नियमानुसार सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे अवश्यक होते. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून अक्षय कर्डिले यांचे नाव समोर केले जात आहे. अक्षय कर्डिले हे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पूत्र तर आमदार संग्राम जगताप यांचे मेहुणे आहेत.

अवश्य वाचा – घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर; कोपरगाव तालुक्यातून १९ सिलिंडर हस्तगत

अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा विश्वास

राहुरी विधानसभा मतदार संघाच्या राजकीय हलचाली बाबत आमदार संग्राम जगताप यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, या निवडणुकीबाबत  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल (ता. १५) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी राहुरी व बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. विरोधकांनी उमेदवार दिल्यास निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याची तयारीही झाली आहे, असे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे पहा – कीर्तनकाराचा मुलीला चटके देत अमानुष अत्याचार…

प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत ते म्हणाले, पक्ष प्रवेशाबाबतचे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. आम्ही कार्यकर्ते आहोत. राज्याचे वरिष्ठ नेते मंडळी योग्य तो निर्णय घेतील. फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही काम करू. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पासून अक्षय कर्डिले राजकारणात सक्रिय आहेत. शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयात अक्षय कर्डिले यांचे योगदान होते. त्यामुळे मला वाटत नाही, अक्षय कर्डिले यांना काही अडचण येईल, असे सूचक वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here