Accident : कोळगाव परिसरात महिनाभरात तिसरा अपघात; पाच जण जखमी

Accident : कोळगाव परिसरात महिनाभरात तिसरा अपघात; पाच जण जखमी

0
Accident : कोळगाव परिसरात महिनाभरात तिसरा अपघात; पाच जण जखमी
Accident : कोळगाव परिसरात महिनाभरात तिसरा अपघात; पाच जण जखमी

Accident : श्रीगोंदा : नगर-दौंड महामार्गावरील (Nagar-Daund Highway) कोळगाव परिसर आता अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनू लागला आहे. शुक्रवारी (ता.२०) दुपारी दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, मागील एका महिन्यात या परिसरात झालेला हा तिसरा मोठा अपघात (Accident) आहे. यापूर्वीच्या अपघातांमध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सतत होणाऱ्या या अपघातांमुळे प्रशासनाबद्दल (Administration) तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमालेचे आयोजन

Accident : कोळगाव परिसरात महिनाभरात तिसरा अपघात; पाच जण जखमी
Accident : कोळगाव परिसरात महिनाभरात तिसरा अपघात; पाच जण जखमी

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले

अहिल्यानगर-दौंड महामार्गावरील कोळगाव (ता. श्रीगोंदा) परिसरातील कुकडी कारखाना फाट्यावर आज (ता. २०) दुपारी दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांमधील सहा प्रवाशांपैकी पाच जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये अशोक होले, मिठू जगताप, सावता गोपीनाथ हिरवे, मोहन जगताप चौघे (रा. पारगाव सुद्रिक, श्रीगोंदा) यांच्या सह एक वृद्ध महिला जखमी झाली.

अवश्य वाचा : पाणी आरक्षण व आवर्तनावरून निळवंडे कृती समिती आक्रमक; अधिकाऱ्यांना निवेदन

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव (Accident )

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील भाविक मढी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. कोळगाव येथे वाहनात इंधन भरून ते महामार्गावर येत असतानाच, नगरकडून दौंडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारची दिशा बदलून ती पुन्हा नगरच्या दिशेला फिरली. अपघाताचा आवाज होताच परिसरातील हॉटेल व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोठे अपघात होण्याची भीती

नगर-दौंड महामार्गावर सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. कोळगाव परिसरात वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील महिनाभरात हा तिसरा मोठा अपघात असून, आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.सतत होणारे अपघात टाळण्यासाठी या महामार्गाचे चौपदरीकरण करणे आणि रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक (Divider) बसवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आणखी मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.