Lockdown Fact Check : भारतात लॉकडाऊन लागणार का ? नेमकं सत्य काय?

0
Lockdown Fact Check : भारतात लॉकडाऊन लागणार का ? नेमकं सत्य काय?
Lockdown Fact Check : भारतात लॉकडाऊन लागणार का ? नेमकं सत्य काय?

Lockdown Fact Check : अमेरिका,इराण आणि इस्राईल या देशातील युद्धजन्य परिस्थितीवर (US,Iran, Israel War)पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशात पुन्हा ‘लॉकडाऊन’ (Lockdown) लागणार असल्याच्या अफवा (Lockdown Fact Check) सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. मात्र,या दाव्यांमध्ये तथ्य नसून पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेचा हप्ता झाला मंजूर, फेब्रुवारीचा हफ्ता ‘या’ दिवशी मिळणार

आता नेमका गोंधळ कुठे झाला? (Lockdown Fact Check)

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत जागतिक संकटावर भाष्य करताना ‘कोविड-१९’ च्या काळातील संकटाचा आणि त्यावेळच्या राष्ट्रीय एकतेचा दाखला दिला होता. या विधानानंतर इंटरनेटवर “भारतात पुन्हा लॉकडाऊन”, “Lockdown News” आणि “काय लॉकडाऊन परत येणार?” असे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाऊ लागले.

पंतप्रधान नेमके काय म्हणाले होते? (Lockdown Fact Check)

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात युद्धाच्या जागतिक प्रभावावर चर्चा केली. “युद्धाची परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत आहे. देशवासीयांनी प्रत्येक आव्हानासाठी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ टिकू शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. भारताने कोविड काळात ज्याप्रमाणे एकजूट दाखवून मोठ्या संकटाचा सामना केला, तशीच एकजूट आताही गरजेची आहे,असे त्यांनी म्हटले. मात्र या भाषणात त्यांनी कुठेही नवीन लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला आश्वस्त केलं आहे की सरकार सतर्क व सज्ज आहे आणि अत्यंत गांभीर्याने रणनीतीवर काम करत असून सर्व आवश्यक ते निर्णय घेत आहे.

अवश्य वाचा: मैत्रिणीलाच मागितली २० लाखाची खंडणी, श्रीगोंद्याच्या तरुणाला अटक

जागतिक संकट, देशाची अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळी यावर चर्चा करण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या बातमीमुळे लॉकडाऊनच्या अफवांना अधिक बळ मिळाले. मात्र या अफवा उठण्याच मुख्य कारण होत ते मोदींचे भाषण. सहा वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्याचा देशातील लोकांच्या जीवनात मोठा परिणाम झाला होता. इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे भारत आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे का? अशा चर्चा त्यांच्या या भाषणामुळे सुरू झाल्या आहेत. जर आपण विचारले की, अमेरिका-इराण युद्धामुळे भारतात लॉकडाउन होईल का, तर त्याचे उत्तर आहे ‘नाही’. पंतप्रधान मोदी किंवा सरकारकडून तसे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

कोविड-१९ महामारीच्या काळात त्याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यावेळी जगभरातील देशांनी ही लॉकडाऊन लागू केल होतं. परंतु इराण-अमेरिका युद्धादरम्यानच्या परिस्थितीत लॉकडाऊन करता येणार नाही. पण तेल संकट आणि एलपीजी संकट हाताळण्यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे, अशा काही उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र पंतप्रधानांनी कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. त्यांनी केवळ “सरकार सतर्क आहे आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी रणनीतीवर काम करत आहे,” असे सांगून जनतेला आश्वस्त केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.