Fraud : श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा

Fraud : श्रीगोंद्यात 'मागेल त्याला सौर पंप' योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा

0
Fraud : श्रीगोंद्यात 'मागेल त्याला सौर पंप' योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा
Fraud : श्रीगोंद्यात 'मागेल त्याला सौर पंप' योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा

Fraud : श्रीगोंदा : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना (Solar Agricultural Pump’ Scheme) सध्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असतानाच, दुसरीकडे याच योजनेच्या नावाखाली लूट सुरू आहे. महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी असल्याचे भासवून आणि बनावट ग्राहक क्रमांकांचा वापर करून श्रीगोंदा तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांची ५ लाख ४३ हजार ८९४ रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी किरण आसाराम बोरुडे याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : मढीत शिव पाणंदचे राज्यस्तरीय अधिवेशन; ट्रस्टींकडून सहकार्याचे आश्वासन

पुढाकार घेऊन तक्रार

श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील ‘सीएससी’ (CSC) केंद्र चालक अविनाश भाऊसाहेब काटे यांनी याप्रकरणी पुढाकार घेऊन तक्रार दिली आहे. जानेवारी २०२५ मध्ये शासनाने सौर पंप योजना जाहीर केली. याचाच फायदा घेत किरण बोरुडे याने काटे यांचा विश्वास संपादन केला. “माझे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध आहेत, मी अवघ्या १५ दिवसांत सौर पंप मंजूर करून देतो,” असे आमिष त्याने दाखवले. संशयित आरोपीने ३८ शेतकऱ्यांकडून शासकीय शुल्कापोटी प्रत्येकी ११ हजार ३१३ रुपये आणि प्रक्रिया शुल्काचे ३ हजार रुपये असे एकूण १४ हजार ३१३ रुपये वसूल केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महावितरणच्या ऑनलाईन प्रणालीत फेरफार (Fraud)

बोरुडे याने विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला काही शेतकऱ्यांना तातडीने पंप बसवून दिले. मात्र, उर्वरित अर्जांसाठी त्याने अत्यंत चलाखीने महावितरणच्या ऑनलाईन प्रणालीत फेरफार केली. नवीन अर्जांवर आधीच अस्तित्वात असलेल्या जुन्या ग्राहकांचे ‘कंझ्युमर नंबर’ टाकून त्याने बनावट मंजुरी मिळवली. मात्र, महावितरणने जेव्हा या प्रकरणाची तांत्रिक तपासणी केली, तेव्हा हे सर्व आयडी ‘डुप्लिकेट’ असल्याचे आढळले. परिणामी, महावितरणने हे सर्व आयडी तातडीने ब्लॉक केले आहेत.

बसवलेले पंप देखील काढून घेण्याचे आदेश

या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे केवळ पैसेच गेले नाहीत, तर तांत्रिक त्रुटींमुळे बसवलेले पंप देखील काढून घेण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची हक्काची शासकीय सबसिडीही धोक्यात आली असून, शेतकरी आता हवालदिल झाला आहे.तक्रारदार अविनाश काटे यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांच्याकडे धाव घेत आरोपीवर कडक कारवाई करण्याची आणि शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.