Amol Khatal : नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : खताळ

Amol Khatal : नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : खताळ

0
Amol Khatal : नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : खताळ
Amol Khatal : नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : खताळ

Amol Khatal : संगमनेर : संगमनेर तालुक्यात झालेल्याअवकाळी पावसासह (unseasonal rain) वादळी वाऱ्याने आणि गारपिटीने मोठे नुकसान झालेल्या भागाची आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी आज (ता. ३०) सकाळी पाहणी करून महसूल व कृषी विभागाच्या (Revenue and Agriculture Departments) अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.

नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

Amol Khatal : नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : खताळ
Amol Khatal : नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : खताळ

पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज व राजापूर या गावांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. गहू, कांदा, टोमॅटो मका तसेच डाळिंब पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांतील उभी पिके आडवी पडली आहेत. गारपिटीमुळे डाळिंब बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धांदरफळ बुद्रुक गावां तर्गत डेरेवाडी येथे संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेली. या घटनेत आदिती संजय साबळे ही जखमी झाली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आश्रमावरील पत्रे गेली उडून (Amol Khatal)

साठेनगर येथील भास्कर आल्हाट यांच्या घरावरील पत्रे उडून गेली. त्याचवेळी घरात झोळीमध्ये झोपलेल्या लहान मुलीला तिच्या आईने प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर काढले. तसेच वर्षा भिमराज गोर्डे यांचे घर कोसळले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेचे, भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. निमज येथील कृषीभूषण पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ यांच्या डाळिंब बागेसह श्यामराव किसन कासार यांच्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच निमज येथील महानुभाव पंथाच्या आश्रमावरील पत्रे उडून गेली आहेत.

शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी

आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यासाठी विलंब न करता पंचनामे पूर्ण करावेत,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक धांदरफळ खुर्द ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.