नगर : राज्यात गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या (Excessive Rainfall) नुकसानीपोटी मिळणाऱ्या मदतीमध्ये (Livestock Compensation) आता राज्य सरकारने महत्त्वाचे बदल करून त्याची नव्याने घोषणा केलीय. या मदतीमध्ये टाकण्यात आलेल्या अटींमध्ये बदल करून सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा (Blanket Assistance for Livestock Farmers) करण्यात आली आहे. त्यामुळे जे पशुपालक शेतकरी या मदतीमधून आधी वगळण्यात आले होते त्यांनाही मदत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नक्की वाचा: आता झेडपी शाळेत प्रवेशावर मिळणार ‘ही’ मोठी सवलत
फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी या नियमात महत्त्वाचा बदल करून त्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय. मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी आता मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मृत झालेल्या जनावरांसाठी आणि गोठ्याच्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
अवश्य वाचा: भारतात लॉकडाऊन लागणार का ? नेमकं सत्य काय?
नियमात केले ‘हे’ महत्त्वाचे बदल (Livestock Compensation)
अल्प, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपाद ग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील. प्रत्येक पशुपालकांना कमाल ३ मोठ्या दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
प्रत्येक पशुपालकांना कमाल ६ ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
प्रत्येक पशुपालकांना कमाल ३० लहान दुधाळ जनावर १० हजार रुपयांच्या मर्यादेऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र असतील.
पशुपालकांना ‘अशी’ मिळेल मदत
- पडझड आणि नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी ३ हजार रुपये मिळणार.
- मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ३७ हजार ५०० रुपये जाहीर.
- ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या मृत्यूसाठी ३२ हजार रुपये मिळणार.
- मृत पावलेल्या लहान जनावरांसाठी २० हजार रुपयांची घोषणा.
- प्रति शेळी आणि मेंढीसाठी ४ हजार रुपयांची मदत जाहीर.
- कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी १०० रुपये दिले देणार.
अशा पद्धतीने शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे.



