Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त मोहीमेला वेग

Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त मोहीमेला वेग

0
Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त मोहीमेला वेग
Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त मोहीमेला वेग

Water Resources Department : राहाता : पावसाळ्यापुर्वीच जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त (Anti-Encroachment) करण्याच्या मोहीमेला चांगलाच वेग आला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात आलेले संकट विचारात घेवून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जलसंपदा विभागाला सक्त सूचना देवून पाण्याचे प्रवाह सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.

नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त मोहीमेला वेग
Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त मोहीमेला वेग

पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अतिक्रमणग्रस्त झाल्याचे निदर्शनास

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने अनेक गावांना पुराच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. अनेक दिवस गावातील पाणी कमी न झाल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतजमीन, पीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. ऐनवेळी पाण्याचे प्रवाह वळवून पुराचे संकट दूर करावे लागले होते. झालेल्या नूकसानीची पाहाणी करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रामुख्याने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अतिक्रमणग्रस्त झाल्याचे निदर्शनास आले. ओढे, नाल्यांवर केलेली बांधकाम आणि प्रवाहच बुजवले गेल्याची कारणे यानिमित्ताने पुढे आली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त मोहीमेला वेग
Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ओढे, नाले अतिक्रमण मुक्त मोहीमेला वेग

आपल्या मतदार संघातून मोहीमेला सुरुवात (Water Resources Department)

मागील वर्षी पावसाळ्यात आलेल्या संकटाचा सामना यंदा पुन्हा करावा लागू नये म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही मोहीम आपल्या मतदार संघातून सुरु केली आहे. जलसंपदा विभागातील सर्व अभियंत्यांना गावात पाठवून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांना विश्वासात घेवून ओढे नाले अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेण्याच्या दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे प्रवरा डाव्या, उजव्या कालव्यावरील अतिक्रमण वेगाने काढणे सुरू झाले आहे.

नैसर्गिक स्त्रोत पुर्ववत करण्यास प्राधान्य

सद्य परिस्थितीत जलसंपदा विभागाने तिसगाव, उक्कलगाव योजना, पाथरे चारी योजना, राजूरी ममदापूर, नांदूर, खंडाळा योजना, राहाता साकुरी चार योजना, चोळकेवाडी तसेच लोणी, हसनापूर हनुमंतगाव, दाढ, कोल्हार, राजुरी ते रानशेंडा, कुरणपूर, उक्कलगाव ओढा या योजनावरील सर्व अतिक्रमण काढून विभागाने पावसाळ्या पुर्वीच नैसर्गिक स्त्रोत पुर्ववत करण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक गावांना मागील पावसाळ्यात महापुराचा सहन करावा लागलेला घोका विचारात घेवून ग्रामस्थ सुध्दा अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेला सहकार्य करीत आहेत.