Dhananjay Jadhav : नगर : अहिल्यानगर महापालिकेचे (Ahilyanagar Municipal Corporation) उपमहापौर धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ५० दिवसात काय? काम केले याचा अहवाल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना सादर केला आहे. महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी विशेष पाठपुरावा केला. तसेच शहरातील सरकारी रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आणि औषधोपचाराबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरणावर भर
शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला. तसेच या नगर शहर स्वच्छ नगर, सुंदर नगर’ या संकल्पनेतून शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहिमेला गती दिली. कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज प्रश्नांवर तातडीने कार्यवाही केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जाधव यांचे कौतुक (Dhananjay Jadhav)
या ५० दिवसात राबवलेल्या उपक्रमाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमहापौर धनंजय जाधव यांचे कौतुक केले आहे.
नव्याने सूत्रे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचा सुरूवातीचा बराचसा काळ सत्कार स्वीकारण्यात आणि जबाबदारी समजून घेण्यातच जातो. त्यामुळे अल्पकालावधी मिळालेल्या पदाधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होते.



