Bhagwangad : बडेवाडी येथे भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहास प्रारंभ

Bhagwangad : बडेवाडी येथे भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहास प्रारंभ

0
Bhagwangad : बडेवाडी येथे भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहास प्रारंभ
Bhagwangad : बडेवाडी येथे भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहास प्रारंभ

Bhagwangad : पाथर्डी : तालुक्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या भगवानगडाच्या (Bhagwangad) ९२ व्या नारळी सप्ताहाचा (Narali Saptah) प्रारंभ बडेवाडी येथे  उत्साहपूर्ण वातावरणात झाला. भगवानबाबांनी (Sant Bhagwan Baba) सुरू केलेल्या या परंपरेचा वारसा आजही भक्तिभावाने पुढे नेला जात असून यावर्षीच्या सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

येत्या दसऱ्याला भगवानगडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण

यावर्षी येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी भगवानगडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने हे वर्ष अमृतमहोत्सवी म्हणून साजरे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्यादिवशी भगवानगडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री यांचा विधिवत अभिषेक करून त्यांना गादीवर विराजमान करण्यात येणार असल्याची माहिती मठाधिपती डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली. ते बडेवाडी येथे आयोजित नारळी सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यंदा यजमानपदाची जबाबदारी बडेवाडी ग्रामस्थांकडे (Bhagwangad)

भगवानबाबांनी तब्बल ९२ वर्षांपूर्वी नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह येथे फिरता नारळी सप्ताह सुरू करून एक अनोखी धार्मिक चळवळ उभी केली. त्या परंपरेचा वारसा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपला जात आहे. यंदा बडेवाडी ग्रामस्थांनी यजमानपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाला महाराष्ट्रभरातून लाखो भाविकांची उपस्थिती लाभते. 

भगवानगड हे जिल्ह्यासह राज्याचे श्रद्धास्थान

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा भजन, हरिपाठ, गाथा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भगवानगड हे  संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे श्रद्धास्थान आहे. या गडावर होणाऱ्या नारळी सप्ताहाला विशेष महत्त्व आहे. हा सप्ताह केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्य, सहकार्य आणि भक्तीभावाची परंपरा जपणारा सोहळा म्हणून ओळखला जातो.