Farmer:संगमनेर: तालुक्यात ज्या-ज्या भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या सर्व भागांत सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या (Farmer) पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार खताळ म्हणाले की, धांदरफळ, निमज, राजापूर, चिखली, निमगाव पागा,पेमगिरी,नांदुरी, दुमाला वडगाव,लांडगा, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी,गुंजाळवाडी,वेल्हाळे चिकणी आणि निमगाव भोजापूर, या गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.
अवश्य वाचा- श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा
सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना (Farmer)
आपण स्वतः काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून ते तातडीनेअचूक करण्यात यावेत,तसेच एक ही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.



