Babasaheb Ambedkar Jayanti : पारगाव सुद्रिक येथे आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Babasaheb Ambedkar Jayanti : पारगाव सुद्रिक येथे आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

0
Babasaheb Ambedkar Jayanti : पारगाव सुद्रिक येथे आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
Babasaheb Ambedkar Jayanti : पारगाव सुद्रिक येथे आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Babasaheb Ambedkar Jayanti : श्रीगोंदा : येथील पंचशिल युवक मंडळ व सर्व जयंती उत्सव समितीच्या वतीने १३ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Babasaheb Ambedkar Jayanti) आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

२३ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

१३ एप्रिल रोजी रात्री ११ ते १२ या वेळेत पंचशिल चौक येथे आंबेडकर जन्मोत्सव सोहळा, १४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतिमा पूजन व त्रिरत्न बौद्ध महासंघ (मुंबई) चे धम्ममित्र प्रणय वानखेडे यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम. २० एप्रिल रोजी आरोग्य शिबिर, बामसेफचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गोरक्षनाथ वेताळ यांचे व्याख्यान यासह २३ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन (Babasaheb Ambedkar Jayanti)

पंचशिल युवक मंडळ व सर्व जयंती उत्सव समितीच्या वतीने या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.