SRH vs RR : आयपीलच्या मैदानात हैदराबादसमोर आज राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना राजस्थान जिंकणार?

0
SRH vs RR : आयपीलच्या मैदानात हैदराबादसमोर आज राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना राजस्थान जिंकणार ?
SRH vs RR : आयपीलच्या मैदानात हैदराबादसमोर आज राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना राजस्थान जिंकणार ?

नगर : आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या १९ व्या मोसमात (IPL 2026) आज सोमवारी (ता.१३) २ चॅम्पियन्स संघ हे आमने सामने असणार आहेत. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा या मोसमातील पाचवा सामना असणार आहे. राजस्थानने रियान परागच्या नेतृत्वात एकूण आणि सलग ४ सामने जिंकले आहेत. तर इशान किशन त्याच्या नेतृत्वात हैदराबादला ४ पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळविता आला आहे. त्यामुळे हैदराबादसमोर राजस्थानचा विजयरथ रोखण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे आता हैदराबाद कमबॅक करत सामना जिंकणार की राजस्थान सलग पाचवा विजय मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नक्की वाचा: MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल ;५३ ऐवजी १५३ संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कधी? (SRH vs RR )

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना आज सोमवारी १३ एप्रिलला होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम पार पडणार आहे. संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. तर ७ वाजता टॉस होईल. हा सामना प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टार लाईव्ह पाहता येईल.

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शरीरसुखाची मागणी ; नेमकं प्रकरण काय?

दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती (SRH vs RR )

राजस्थान रॉयल्स हा संघ या मोसमातील अजिंक्य संघ आहे. राजस्थानने खेळलेल्या चारही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. राजस्थानच्या खात्यात ८ गुण आहेत. तर राजस्थानचा नेट रनरेट हा +२.०५५ असा आहे. तर हैदराबादला ४ पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. हैदराबाद २ गुणासंह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा – ०.०२४असा आहे.

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघ एकूण २१ वेळा आमनेसामने आले आहेत. हैदराबादने या २१ पैकी १२ सामन्यांमध्ये राजस्थानला पराभवाची धुळ चारली आहे. तर राजस्थानने हैदराबादवर ९ सामन्यांत मात केली आहे. अशात आता २२ व्या सामन्यात दोघांपैकी कोण मैदान मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.