Local Crime Branch : नगर : जिल्ह्यातील संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ९५० किलो गोमांसासह इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, आठवडाभरात अशा प्रकारची ही चौथी कारवाई (Action) असल्याने प्रशासनाने अवैध कत्तलींविरोधात कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्की वाचा : मोटारसायकल चोरी प्रकरणी सापळा रचून जप्त केली चार आरोपींना अटक
यांच्यावर गुन्हा दाखल
छाप्यात शेडमध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल केलेले मांस आढळून आले. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवाज जावेद कुरेशी, समद जावेद कुरेशी आणि नावेद जावेद कुरेशी (सर्व रा. भारतनगर, संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम (Local Crime Branch)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.
१३ एप्रिल रोजी या पथकाला संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, गल्ली क्रमांक ६ येथे पत्र्याच्या शेडमध्ये अवैध कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन लाख ८५ हजार रुपये किमतीचे ९५0 किलो गोमांस, दोन हजार २०० रुपये किमतीचा चाकू, दोन काणस आणि एक इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण दोन लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या आठवडाभरात अशा प्रकारच्या चार कारवाया करत तब्बल २० लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डिले, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे.



