
Water Filter : पाथर्डी : ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचे वास्तव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने चिंचपूर इजदे (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद शाळेला बाळासाहेब साहेबराव खेडकर (Balasaheb Sahebrao Khedkar) सर प्रतिष्ठानच्या वतीने वॉटर फिल्टर (Water Filter) मशीनची भेट देण्यात आली.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात गॅस एजन्सींचा मेसेज घोटाळा; डिलीवरी मिळण्यापूर्वीच डिलीवरी सक्सेसचा मेसेज
यावेळी जयश्री बाळासाहेब खेडकर म्हणाल्या की,
या शाळेमध्ये मी बारा वर्षे सेवा केली असून येथील अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाण्याची गरज ओळखून हा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पालक व ग्रामस्थांनीही एकत्रितपणे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळांना मुक्तहस्ताने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यावेळी उपस्थिती (Water Filter)
कार्यक्रमास मंगल साहेबराव खेडकर, डॉ. रामनाथ खेडकर, भगवान महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय फुंदे, अविनाश खेडकर, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक त्रिंबक खेडकर, प्रसाद भिसे, विक्रम खेडकर, बाबासाहेब खेडकर, उद्धव खेडकर, सोसायटीचे चेअरमन अनंत खेडकर, शिवनाथ मिसाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर खेडकर, सदस्य श्रीराम खेडकर, अंकुश सानप, रामदास त्रिंबक खेडकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुशिला बांगरे यांनी तर आभार गीता गाडेकर यांनी मानले.


