Shirdi : श्री साईबाबा संस्थानचे ‘हरित ऊर्जे’कडे भक्कम पाऊल; सौर प्रकल्पांमुळे वीज बचतीला मोठी चालना

Shirdi : श्री साईबाबा संस्थानचे ‘हरित ऊर्जे’कडे भक्कम पाऊल; सौर प्रकल्पांमुळे वीज बचतीला मोठी चालना

0
Shirdi : श्री साईबाबा संस्थानचे ‘हरित ऊर्जे’कडे भक्कम पाऊल; सौर प्रकल्पांमुळे वीज बचतीला मोठी चालना
Shirdi : श्री साईबाबा संस्थानचे ‘हरित ऊर्जे’कडे भक्कम पाऊल; सौर प्रकल्पांमुळे वीज बचतीला मोठी चालना

Shirdi : नगर : श्री साईबाबा संस्थान तर्फे पर्यावरणपूरक ‘हरित ऊर्जा’ वापर वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून संस्‍थानच्‍या विविध इमारतींच्या छतांवर १७०९.९२ kWp क्षमतेचा ग्रीड-कनेक्टेड रूफटॉप सोलर पीव्ही प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कडून CSR निधीतून सुमारे ४ कोटी ४५ लाख रुपयांची मदत मिळणार असून उर्वरित खर्च संस्थान उचलणार आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात गॅस एजन्सींचा मेसेज घोटाळा; डिलीवरी मिळण्यापूर्वीच डिलीवरी सक्सेसचा मेसेज

यांची उपस्थिती (Shirdi)

या प्रकल्पासाठी संस्थान आणि BPCL यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारावेळी शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, विद्युत विभागाचे प्र. उपकार्यकारी अभियंता किशोर गवळी तसेच संस्थानचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच BPCL फाउंडेशनच्या वतीने जीएम व सीईओ बिना मनसुख, जीएम (अतिरिक्त प्रभारी CSR) देवेंद्र जोशी, DGM (वित्त CSR) राजेश तिखे, DGM (CSR) संजय यादव, सहायक कार्यकारी व सचिव मुकेश मुनेश्वर, उपमहाव्यवस्थापक एन. मेघनाथन, अभिजीत चव्हाण, महेश एम., राजकुमार मिश्रा, मनोज जाधव व हर्षा बिडावटका उपस्थित होते.

२६ लाख युनिट वीज निर्मिती (Shirdi)

शिर्डी येथे दररोज देश-विदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसर, रुग्णालये, पाणीपुरवठा व्यवस्था आणि इतर सुविधांसाठी अखंड वीजपुरवठा आवश्यक ठरतो. वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर संस्थानने ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे पावले उचलली आहेत. BPCL मार्फत उभारण्यात येणारा १.७ मेगावॅट सौर प्रकल्पातुन दरवर्षी सुमारे २६ लाख युनिट वीज निर्मिती होईल. यामुळे अंदाजे २ कोटी ५६ लाख रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय ONGC कडून १.९ मेगावॅट क्षमतेचा ग्राउंड माउंट सोलर प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही प्रक्रियेत आहे.

हेही पहा : पगारावरचे चोर! सुशिक्षित हातांना कामाऐवजी मिळालं ‘चोरीचं’ टार्गेट

सध्या संस्थानचा एकूण वीज वापर सुमारे ७.९६ मेगावॅट इतका असून प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पवन ऊर्जा, रूफटॉप सोलर आणि ग्राउंड माउंट सोलर यांच्या माध्यमातून सुमारे ७.३ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्यामुळे संस्थान लवकरच विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार असून ‘हरित ऊर्जा’ वापरासाठी श्री साईबाबा संस्थान एक आदर्श ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.