नगर : महाराष्ट्र राज्याचा राज्यकारभार चालवणाऱ्या मंत्रालयात दहशतवादी कारवायांचा संभाव्य धोका (Potential Threat of Terrorist Activities) लक्षात घेता, आता मंत्रालयाला पोलिसांच्या ‘एलिट गार्ड’ (Elite Guard) या कमांडोचे संरक्षक कवच (Mantralay Security) देण्यात आले आहे. डोळ्याला काळा गॉगल, हातामध्ये एके-४७ आणि उजव्या हाताचे एक बोट बंदुकीच्या ‘ट्रिगर’वर अशा सदैव सज्जतेमध्ये हे कमांडो सध्या मंत्रालयातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असतील.
नक्की वाचा: राज्यात २.२१ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार ; मंत्री आदिती तटकरेंची माहिती
मंत्रालयाला तिहेरी सुरक्षा कवच (Mantralay Security)

मुंबईसह महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांना सध्या मोठा धोका मानला जात आहे. मंत्रालयाला तर सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येतं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आता तर मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर प्रत्येकी एक-एक एलिट गार्ड मधील प्रशिक्षित कमांडो तैनात केला आहे. त्याच्या हातात एके-४७ सारखे अत्याधुनिक शस्त्र दिलेले आहे. यांची नजर फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या हालचालींवर असते. तिहेरी सुरक्षा कवच मंत्रालयाला तिहेरी सुरक्षा कवच आहे.
अवश्य वाचा: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? नवीन अपडेट आली समोर
‘एलिट गार्ड’ म्हणजे कोण?(Mantralay Security)
एलिट गार्ड किंवा एलिट पोलीस फोर्स ही पोलीस दलातील विशेष पोलिसांची प्रशिक्षित तुकडी असते. या तुकडीतील कमांडोंचा वापर दहशतवादी कारवायांच्या विरोधात आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि अत्यंत गोपनीय आणि उच्च दर्जाच्या मोहिमांमध्ये वापर केला जातो. दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचे विशेष प्रशिक्षण या तुकडीला दिले गेलेले असते. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात एलिट पोलीस फोर्स हे आता कायमस्वरूपी तैनात करण्यात आले आहे.



