
नगर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा (Vidhan Parishad Election Date) केली आहे. विधानपरिषदेच्या या ९ जागांसाठी २३ एप्रिलपासून अर्ज दाखल (Applications to be filed starting April 23) करता येणार आहे. या निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान (Voting on May 12) होणार आहे. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे यांच्यासह ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येणार असल्याने रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
नक्की वाचा: अखेर न्याय मिळाला! पत्नीची हातोड्याने हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप
२३ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार (Vidhan Parishad Election Date)
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २३ एप्रिल २०२६ पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ३० एप्रिल २०२६ ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. २ मे २०२६ रोजी अर्जांची छानणी करण्यात येणार असून ४ मे २०२६ हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी १२ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरवात होईल.
अवश्य वाचा: सोन्यासाठी विहिरीत उतरले संदीप पाठक; ‘घबाडकुंड’ मध्ये संदीप यांचा भन्नाट अंदाज
विधानसभेत असणाऱ्या संख्याबळानुसार विधानपरिषद निवडणुकीत ९ जागांपैकी ५ जागा भाजपच्या वाट्याला, २ जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, तर १ जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांत मिळून एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपणार?(Vidhan Parishad Election Date)
१. उद्धव ठाकरे
२. नीलम गोऱ्हे
३. शशिकांत शिंदे
४. अमोल मिटकरी
५. गोपीचंद पडळकर
६. रणजितसिंह मोहिते-पाटील
७. राजेश राठोड
८. प्रवीण दटके
९. रमेश कराड


