Ahilyanagar : रेशन दुकानात मोफत साडी मिळणार; ८७ हजार लाभार्थ्यांना फायदा

Ahilyanagar : रेशन दुकानात मोफत साडी मिळणार; ८७ हजार लाभार्थ्यांना फायदा

0
Ahilyanagar : रेशन दुकानात मोफत साडी मिळणार; ८७ हजार लाभार्थ्यांना फायदा
Ahilyanagar : रेशन दुकानात मोफत साडी मिळणार; ८७ हजार लाभार्थ्यांना फायदा

Ahilyanagar : नगर : जिल्ह्यातील ८७ हजार अंत्योदय रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या साडी वाटप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या कुटुंबांना मोफत साडी मिळणार आहे. जिल्हा रेशन पुरवठा विभागाने साड्यांची मागणी नोंदवली असून, एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला दुकानांमार्फत याचे वितरण होईल. लग्नसराईच्या काळात या लाभामुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

हेही वाचा : समर्थ क्रॉप केअर प्रकरणी गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

पारदर्शक पद्धतीने वितरण (Ahilyanagar)

शासनाच्या निर्णयानुसार, पुरवठा विभागाने जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या साड्यांची मागणी नोंदवली आहे. साड्यांचा साठा उपलब्ध होताच, त्याचे वितरण रेशन दुकानांमार्फत पारदर्शक पद्धतीने केले जाणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना यासंबंधीच्या सूचना लवकरच निर्गमित केल्या जातील. यापूर्वी जिल्ह्यात एकदा साडी वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा शासनाने ही योजना राबविण्याचे निश्चित केल्याने गरीब कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या योजनेचा मुख्य उद्देश अत्यंत गरीब असलेल्या अंत्योदय कुटुंबांना सणासुदीच्या किंवा विशेष प्रसंगी नवीन वस्त्र उपलब्ध करून देणे हा आहे.

नक्की पाहा : कोल्हुबाईचे कोल्हार येथील डोंगरावरील वनसंपत्तीला आग

एप्रिल-मे महिन्यात होणार वितरण (Ahilyanagar)

‘अंत्योदय कुटुंबांना रेशन दुकानांतून मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाने महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे साड्यांची मागणी नोंदवली आहे. साड्या मिळताच वाटप सुरू करण्यात येणार आहे’, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली. सध्या प्रशासकीय पातळीवर साड्यांची मागणी आणि वाहतुकीचे नियोजन सुरू आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रत्यक्ष वाटप सुरू होईल. उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईच्या काळात हा लाभ मिळत असल्याने लाभार्थी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.