Economic Offences Wing : समर्थ क्रॉप केअर प्रकरणी गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

Economic Offences Wing : समर्थ क्रॉप केअर प्रकरणी गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

0
Economic Offences Wing : समर्थ क्रॉप केअर प्रकरणी गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
Economic Offences Wing : समर्थ क्रॉप केअर प्रकरणी गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

Economic Offences Wing : नगर : समर्थ क्रॉप केअर ट्रेड प्रा. लि. या कंपनीकडून गुंतवणूकदारांची झालेल्या फसवणुकीच्या (Fraud) प्रकरणी जिल्ह्यात दाखल दोन गुन्ह्यांचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे (Economic Offences Wing) वर्ग करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी जारी केला आहे.

नक्की वाचा : राहुरीच्या पोटनिवडणूकीसाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा : जिल्हाधिकारी

गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप

समर्थ क्रॉप केअर ट्रेड प्रा. लि. या कंपनीविरोधात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या आरोपावरून शेवगाव व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडून सुरू होता. त्यांनी कंपनीचा चेअरमन प्रशांत गवळी याला अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे. तपासादरम्यान कोतवाली पोलिसांनी १०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले असून फसवणूकीचा आकडा सव्वा चार कोटींच्या पुढे गेला आहे. दुसरीकडे पुणे येथे देखील यासंदर्भातील एक गुन्हा दाखल आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मूळ कागदपत्रे ताब्यात घेण्याच्या सूचना (Economic Offences Wing)

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा सखोल व एकत्रित तपास व्हावा, यासाठी संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना हे गुन्हे तात्काळ पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षकांना संबंधित सर्व पोलीस ठाण्यांकडील मूळ कागदपत्रे त्वरित ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा बारकाईने तपास करून मुदतीत कायदेशीर कारवाई पूर्ण करण्याचे निर्देशही आदेशात नमूद करण्यात आले आहेत. याशिवाय, तपासाची प्रगती वेळोवेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.