Illegal Liquor Transport : संगमनेर मध्ये अवैध दारू वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Illegal Liquor Transport : संगमनेर मध्ये अवैध दारू वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Illegal Liquor Transport : संगमनेर मध्ये अवैध दारू वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Illegal Liquor Transport : संगमनेर मध्ये अवैध दारू वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Illegal Liquor Transport : नगर : संगमनेर तालुक्यात अवैध दारू वाहतूक (Illegal Liquor Transport) करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तीन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुनिल रामनाथ मोरे (वय- ४२, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर), गणेश पंढरीनाथ मोरे रा. पिंपळगाव कोझींरा, ता. संगमनेर), यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangamner City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : राहुरीच्या पोटनिवडणूकीसाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा : जिल्हाधिकारी

पोलीस निरीक्षक कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर ते अकोले जाणारे रस्त्यावर एका रिक्षा मधून अवैध दारू वाहतूक होत असल्याचे खात्रीशीर मिळती मिळाली. त्यानुसार पथकास कारवाईच्या सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपीस ताब्यात घेतले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

३ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Illegal Liquor Transport)

त्याच्याकडून ३ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.