Gold Rate Today : अक्षय तृतीयेला सोनं स्वस्त होणार की आणखी महागणार? आजचे दर किती?

0
Gold Rate Today : अक्षय तृतीयेला सोनं स्वस्त होणार की आणखी महागणार ? वाचा सविस्तर…
Gold Rate Today : अक्षय तृतीयेला सोनं स्वस्त होणार की आणखी महागणार ? वाचा सविस्तर…

नगर : सोने आणि चांदीच्या दरात (Gold Rate Today) मागील काही दिवसांपासून चढ उतार होताना पाहायला मिळत आहेत. जागतिक बाजारासोबतच देशांतर्गत बाजारातही तब्बल तीन दिवसांच्या तेजी नंतर आज सोन्याच्या दरात घसरण (Decline in Gold Prices) पाहायला मिळाली. मागील तीन दिवसांत ३ हजारांची वाढ झाल्यानंतर, अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीया (Akshay Trutiya) सणापर्यंत भाव आणखी वाढतील,असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आज अचानक दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नक्की वाचा: LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर

सोन्याचा आजचा भाव किती? (Gold Rate Today)

गुड्सरीटर्न्स वेबसाइटने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सह इतर शहरांमध्ये २४ कॅरेटचा भाव १,३७० रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम १,५४,२०० रुपये झाला आहे. तर प्रति ग्रॅमचा चा भाव १५,४२० एवढा आहे. दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५४,३५० एवढा आहे.

अवश्य वाचा: राज्यात उष्णेतचा पारा ४४ अंशांच्या पार;कुठे किती तापमान?

२२ आणि १८ कॅरेटचा भाव किती? (Gold Rate Today)

देशभरात आणि राज्यभरात आज २२ कॅरेट सोन्याचा भावही घसरला आहे. मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये प्रति तोळा१,४१,३५० रुपये तर प्रति ग्रॅम सोनं १४,१३५ रुपयांना विकलं जात आहे. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोनही आज स्वस्त झालं आहे. राज्यभरात १८ ग्रॅमचा प्रति तोळा भाव १,१५,६५० रुपये झाला आहे. तर प्रति ग्रॅमचा भाव ११,५६५ रुपये इतका झाला आहे.

चांदीचा भाव काय? (Gold Rate Today)

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आज दिल्लीसह महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये चांदीचा भाव ५ हजारांनी स्वस्त होऊन प्रति किलो २,६५,००० रुपये इतका झाला आहे. आजचा भाव उच्चांकापासून अजूनही १.५५ लाख रुपयांनी स्वस्त आहे. कमोडिटी बाजार MCX वर आज सकाळी सोन्याचे भाव किंचित घसरून प्रति १० ग्रॅम १,५३,०८६ रुपयांवर व्यवहार होते. तर चांदीही २,४९, ४६९ रुपयांवर व्यवहार करत होती.