Murder Case | खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी रामा गाडे व साथीदार पोलिसांच्या ताब्यात

0

Murder Case | शेवगाव : शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील तरुणाच्या खून प्रकरणातील (Murder Case) मुख्य आरोपी रामा चंद्रकांत गाडे व त्याचा एक साथीदार (अल्पवयीन मुलगा) यांना शेवगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

हे वाचा – कर्जत-जामखेड मतदारसंघात दोन लाख ७३ हजार मतदारांची एसआयआर प्रक्रिया पूर्ण

मारहाण करून खून (Murder Case)

११ एप्रिल २०२६ रोजी सकाळच्या सुमारास मयत संदीप दिनकर लांडे (वय ३२, रा. सालवडगाव, ता. शेवगाव) हे शेतात काम करत असताना त्यांच्या काही मित्रांनी त्यांना शेवगाव येथे येण्यासाठी बोलावले. त्यानंतर ढाकणे वस्ती, डायमंड शाळेच्या मागील परिसरात त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपी रामा गाडे व त्याच्या साथीदाराने लाकडी काठी, कमरेचा बेल्ट व दगड यांच्या सहाय्याने मारहाण करून संदीप लांडे यांचा खून केला. या प्रकरणी मयताचे वडील दिनकर भानुदास लांडे (वय ५५) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अवश्य वाचा- LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर

तीन स्वतंत्र पथके तयार (Murder Case)

घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी सातत्याने शोधमोहीम राबवित अखेर १६ एप्रिल रोजी पहाटे आखेगाव रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आरोपींचा माग काढला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींना शेवगाव पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

हे पहा – Facebook वर 1 क्लिक करणं महागात; पुणेकर काकांचे सव्वा कोटी एकदम गायब

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here