Child Marriage : पारनेर : शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया (Akshay Tritiya) निमित्ताने जिल्ह्याताील बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी कडक भूमिका घेतली आहे. बालविवाह (Child Marriage) ही परंपरा नसून तो कायदेशीर गुन्हा (Legal Offense) आहे, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला आहे.
नक्की वाचा : उजळून देते म्हणत वृद्धेचे दागिने केले लंपास; पाथर्डीत येथील घटना
बालविवाह रोखण्यात महत्त्वपूर्ण काम
स्नेहालयचा उडान प्रकल्प मागील सात वर्षांपासून अक्षय तृतीया काळात विशेष सतर्कता ठेवून कार्यरत आहे. कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने विवाह थांबवणे, मुलीचे संरक्षण करणे आणि तिला पुढील पुनर्वसनासाठी बाल कल्याण समितीसमोर सादर करणे ही कार्यपद्धती राबवली जाते. स्नेहालय संस्थेने मागील वस वर्षांपासून चाईल्ड हेल्पलाईन १०९८ च्या माध्यमातून बालविवाह रोखण्यात महत्त्वपूर्ण काम केले असून, उडान प्रकल्पाद्वारे “बालविवाह मुक्ती मिशन” प्रभावीपणे सुरू आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
“भावनेतून” मदत करणेही कायद्याने गुन्हाच (Child Marriage)
जिल्ह्यात सध्या बालविवाह प्रकरणांवर थेट गुन्हे दाखल होत असून बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पॉक्सो कायदा अंतर्गत कठोर कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे, बालविवाहानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यास तो पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो. या गुन्ह्यात केवळ पालकच नव्हे, तर नातेवाईक, विवाह लावणारे धर्मगुरू, मध्यस्थी, आयोजन करणारे, खर्चासाठी मदत करणारे, तसेच पाहुणे म्हणून उपस्थित राहून समर्थन देणारे सर्वजण आरोपी ठरू शकतात. माहिती असूनही कारवाई न करणारे सरपंच, नगरसेवक किंवा अधिकारी देखील जबाबदार धरले जाऊ शकतात. “भावनेतून” मदत करणेही कायद्याने गुन्हाच मानला जातो.
जरंडीकर यांनी सांगितले की
बालविवाह रोखण्यासाठी शासनाने ग्रामसेवक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका तसेच गाव, वार्ड आणि तालुकास्तरावरील बाल संरक्षण समित्या यांना जबाबदारी दिली आहे. या समित्यांमध्ये शिक्षण, पोलीस, आरोग्य, पंचायत व महिला बाल विकास विभागातील अधिकारी सहभागी असून, नागरिकांनी त्यांच्याशी समन्वय साधणे अपेक्षित आहे. याबाबत स्नेहालयचे संचालक हनिफ शेख आणि ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी सांगितले की, “बालविवाह सहन केला जाणार नाही.” तर उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी नागरिकांना आवाहन केले की, “बालविवाह लपवू नका, त्वरित माहिती द्या.”कुठेही बालविवाह होत असल्यास १०९८ किंवा ९०११०२६४९५ वर संपर्क साधावा. माहिती गोपनीय ठेवली जाईल. भावना नाही, तर मुलीचे भविष्य आणि कायदा महत्त्वाचा आहे.



